अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्यावरून कारवाई

बीजिंग (चीन) – चीनमधील प्रसिद्ध शाओलिन मंदिराचे मुख्य पुजारी शी योंग्झिन यांना मंदिराच्या मालमत्तेचा आणि निधीचा अपहार करणे, अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवणे अन् अनेक अनौरस मुलांना जन्माला घालणे अशा गंभीर आरोपांमुळे पदावरून काढून टाकण्यात आले आहे. अनेक सरकारी संस्था संयुक्तपणे या आरोपांची चौकशी करत आहेत.
🔴 After the Buddhist monks’ sex scandal in Thailand…
🛕 Now, Shaolin Temple’s Shi Yongxin – the “CEO Monk” is under investigation in China!
💰 Accused of:
🔸 Embezzlement
🔸 Misuse of temple funds
🔸 Affairs with multiple women & fathering illegitimate children🤔 Will… https://t.co/FRNM92dOEx pic.twitter.com/BjBGoB2NlV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 30, 2025
चीनच्या बुद्धिस्ट असोसिएशनने त्यांचे प्रमाणपत्र काढून घेतले आहे. असोसिएशनने म्हटले आहे की, शी योंग्झिन यांच्या कृतींमुळे बौद्ध समुदाय आणि भिक्षू यांच्या प्रतिमेला गंभीर हानी झाली आहे.
शाओलिन मंदिराचा इतिहास
शाओलिन मंदिर मध्य चीनमधील हेनान प्रांतातील टेकड्यांमध्ये आहे. हे १ सहस्र ५०० वर्षे जुने मंदिर केवळ धार्मिक कारणांसाठीच नाही, तर त्याच्या मार्शल आर्ट्स परंपरेसाठी, विशेषतः ‘कुंग फू’साठी प्रसिद्ध आहे. भारत आणि परदेश येथून प्रतिवर्षी लाखो लोक हे मंदिर पहाण्यासाठी येतात.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या संतांची अपकीर्ती केली जात असतांना बौद्धांच्या धार्मिक प्रमुखाविषयी चित्रपटांतून अशा प्रकारचे चित्रण कधी दाखवले जाईल का ? |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal