१५ लाखांच्या औषधांची तस्करी करत सीमा ओलांडत होते

आगरतळा (त्रिपुरा) – दक्षिण त्रिपुराच्या सीमेलगतच्या भागात सीमा सुरक्षा दलाने भारतातून विविध वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार्या बांगलादेशी तस्करांवर केलेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १ जण घायाळ झाला. घायाळ झालेल्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. जाकिर हुसेन मिल्लत आणि महंमद यासीन लिटन यांचा मृत्यू झाला, तर महंमद अफसर घायाळ झाला.
२६ जुलै या दिवशी हे तिघे सीमेवरून बांगलादेशात जात असतांना सैनिकांनी त्यांना हटकले. तेव्हा त्यांनी सैनिकांवर आक्रमण केले. या वेळी प्रत्युत्तरात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात महंमद यासीन लिटन घटनास्थळीच ठार झाला, तर जाकिर हुसेन मिल्लत याचा रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत झाला. घटनास्थळावरून १५ लाख रुपयांच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
भारतीय तस्करही अटकेत
त्रिपुरा पोलिसांचे साहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) रणधीर देबबर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणात २ भारतीय तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. या तस्करांकडे चौकशी करून संपूर्ण तस्करी जाळ्याविषयी माहिती गोळा केली जात आहे.
सीमा सुरक्षा दलाने ठार झालेल्या बांगलादेशी तस्करांचे मृतदेह बांगलादेश सीमा सुरक्षा दलाकडे सोपवले आहेत. या वेळी कमांडंट स्तरावर ‘फ्लॅग मीटिंग’ही झाली, ज्यामध्ये बांगलादेशाच्या अधिकार्यांनी गोळीबाराविषयी चिंता व्यक्त केली. (बांगलादेशी तस्करांविषयी नव्हे, तर त्यांना रोखण्यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारावर चिंता व्यक्त करणारे बांगलादेशी अधिकारी ! अशा उद्दाम अधिकार्यांना धडा शिकवणे आवश्यक ! – संपादक)
तस्करी सहन केली जाणार नाही ! – भारत
भारतीय सीमा सुरक्षा दलाने स्पष्टपणे सांगितले की, भारत-बांगलादेश सीमावर तस्करी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. जर सुरक्षा दलांवर आक्रमण झाले, तर आत्मरक्षणात प्रत्युत्तर देणे अपरिहार्य होते.
सीमेवर वाढवण्यात आला बंदोबस्त

या घटनेनंतर सीमा सुरक्षा दलाने सीमा भागांत गस्त अधिक तीव्र केली आहे. अधिकार्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेसंदर्भात भारताची नीती ‘शून्य सहिष्णुता’ आहे. तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे (रात्रीच्या अंधारात पहाता येणारे कॅमेरे)आणि अतिरिक्त गस्त यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत बांगलादेशी तस्कर गोवंशियांची तस्करी करत असल्याचे ठाऊक होते, आता ते औषधांचीही तस्करी करू लागले, याचा अर्थ बांगलादेश भीकेला लागला असून लवकरच त्याचे दिवाळे निघणार आहे, हे लक्षात येते ! |
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी