
वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी, लक्ष्मणपुरी (लखनौ), सैदपूर (गाझीपूर), प्रयागराज, नटवा (वाराणसी) आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याविषयीचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.
वाराणसी
पहडिया येथील ‘हॉटेल सुरभी इंटरनॅशनल’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, अधर्माविरुद्ध लढणे हाच धर्म आहे. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवून अधर्माविरुद्ध सक्रीय रहावे. हा आपल्या गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श आहे आणि या मार्गावर चालणे, हीच खरी गुरुदक्षिणा आहे.’ या वेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. सर्वजीत शाही यांनी ‘राष्ट्र्ररक्षण आणि धार्मिक संवर्धन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी श्री. शाही यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘रोगिओं की सेवा कैसे करे ?’, या लघुग्रंथाचे प्रकाशन झाले. या वेळी २३५ हून अधिक भाविक महोत्सवाला उपस्थित होते.
भदोही
येथील औराई रस्त्यावरील ‘सेलिब्रेशन पॅलेस’मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. येथे समितीचे श्री. गुरुराज प्रभु यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा १८० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
लक्ष्मणपुरी

येथील गोल्फ सिटीमधील ‘आनंद रिसॉर्ट्स’मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘धार्मिक उत्सव एवं व्रतों का अध्यात्मशास्त्रीय आधार’ या हिंदी भाषेतील ई-बुकचे प्रकाशन उत्तरप्रदेश विधानसभेचे सचिव श्री. प्रदीप दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाला २५० हून अधिक भाविक उपस्थित होते. या वेळी समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. ‘लोकभारती’चे लक्ष्मणपुरी येथील अध्यक्ष श्री. कमलेश गुप्ता आणि त्यांच्यासमवेत आलेले त्यांचे कार्यकर्ते म्हणाले, ‘‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दिव्य आहे. लक्ष्मणपुरीमध्ये अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.’’
२. सभागृहाचे मालक श्री. आनंदा इंद्रमोहन यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सभागृह, व्यासपीठ, बैठक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली, तसेच सेवेसाठी आलेल्या साधकांसाठी अल्पाहार आणि भोजन यांची व्यवस्था केली.
३. कार्यक्रमानंतर लक्ष्मणपुरी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सी.पी. तिवारी यांनी पूर्णवेळ साधक होण्याची इच्छा व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर
निवृत्त सनदी अधिकारी कॅप्टन एस्.के. द्विवेदी, निवृत्त सनदी अधिकारी श्री. चंद्रिका प्रसाद तिवारी, उत्तरप्रदेश सरकारचे निवृत्त संयुक्त सचिव श्री. शशिकांत शुक्ला, ‘जनउद्घोष सेवा संस्थे’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कुलदीप तिवारी, ‘हिंदु जनसेवा समिती’चे अध्यक्ष श्री. प्रज्वल गुप्ता, ‘ब्रह्मसागर संघटने’च्या सुषमा मिश्राचार आणि अन्य अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.
नटवा (वाराणसी)
बडागाव येथील शिवपुरी वाटिकेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. येथे सनातन संस्थेच्या रिता पाठक यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार मौर्य यांनी ‘युद्धाच्या वेळी हिंदु संघटनाचे महत्त्व आणि स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो ?’, या विषयावर संबोधित केले. या महोत्सवाचा लाभ २१० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्रे
१. गावप्रमुख श्री. रवींद्र कुमार पटेल हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने प्रभावित झाले. यापुढे त्यांनी समितीच्या धार्मिक कार्यात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली.
२. श्री. सीताराम अग्रहारी यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले, तसेच ‘पुढेही समितीच्या कार्यक्रमांसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देऊ’, असे त्यांनी सांगितले.
सैदपूर (गाझीपूर)
येथील कौशिक उपवन विवाह सभागृहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी समितीचे श्री. राजन केशरी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या महोत्सवात ‘ज्ञानवापी’च्या न्यायालयीन प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘भगवान शिवसम्बन्धी अध्यात्मशास्त्रीय विवेचन’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवाला १३६ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. स्थानिक हिंदू प्रतिदिन ३ घंटे गुरुपौर्णिमेचा प्रचार करण्यासाठी जात होते.
२. कौशिक उपवन सभागृहाचे मालक श्री. विशाल सिंह यांनी सभागृह आणि तंबू यांसाठी सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. स्थानिक धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे शहरात एकूण ११ होर्डिंग्ज बनवून लावले. धर्मप्रेमी श्री. सोनू मौर्य यांनी साधकांच्या नाश्त्याची व्यवस्था, तर श्री. सियाराम प्रजापती यांनी भोजनाच्या पाकिटांची व्यवस्था केली.
प्रयागराज
येथील ‘बी.बी.एस्. स्कूल अँड इंटर कॉलेज’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी ‘सध्याच्या स्थितीत अधिकाधिक हिंदूंनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी योगदान द्यावे’, असे उपस्थितांना सांगितले. या वेळी प्रयागराजचे हिंदुत्वनिष्ठ श्री. अतुल खन्ना यांनी सौ. जुवेकर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला १०८ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
क्षणचित्र
‘बी.बी.एस्. स्कूल अँड इंटर कॉलेज’चे संचालक श्री. ऋषि सहाय, व्यवस्थापक श्री. रणजित सिंह आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रमासाठी शाळेचे सभागृह, विद्युत्जनित्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.
गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर