Ezra Sargunam Road : ‘हिंदु’ कोणताही धर्म नाही’, ‘जो ख्रिस्ती बनत नाही, त्याला रक्त येईपर्यंत मारा’ असे म्हणणार्‍या पाद्रयाच्या नावाने रस्ता !

तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) सरकारचा हिंदुद्वेष !

पाद्री एज्रा सरगुनम्

चेन्नई (तमिळनाडू) – येथील किलपौक परिसरातील ‘वाडेल्स रोड’चे नाव पालटून ‘आर्चबिशप (वरिष्ठ पाद्री) एज्रा सरगुनम रोड’ असे ठेवण्यात आले आहे. या रस्त्याच्या नामकरणाचा औपचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात द्रमुकचे मंत्री के.एन्. नेहरू, हिंदु धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट मंत्री शेखरबाबू, चेन्नईच्या महापौर आर्. प्रिया आणि द्रमुकचे आमदार इनिगो इरुधयराज उपस्थित होते.

या नामकरणाला जनतेमधून विरोधही करण्यात आला. तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष आणि आमदार नैनार नागेंद्रन् यांनी यांनी आर्चबिशप एज्रा यांच्या हिंदुविरोधी भाषणांचे व्हिडिओ एक्सवर प्रसारित केले. त्यांनी म्हटले की, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की, द्रमुक सरकारने अशा व्यक्तीच्या नावाने रस्ता नामांकित केला, जो हिंदूंच्या विरोधात विष उगाळायचा. मी प्रसारित केलेल्या व्हिडिओतून ‘त्याला हिंदूंविषयी किती द्वेष होता?’, हे स्पष्ट होते. त्याने उघडपणे हिंदूंविरुद्ध हिंसा करण्याचे आवाहन केले होते.

एज्रा सरगुनम् याने केलेली हिंदु धर्मविरोधी विधाने

१. हिंदु हा कोणताही धर्म नाही.

२. जो हिंदु धर्माला खरा ‘धर्म’ मानतो त्याला गप्प बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी करण्यात येणारी हिंसाही योग्य आहे. (मोहनदास गांधी यांचा अहिंसावाद हिंदूंसाठी होता, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्मासाठी काहीही करण्यास सिद्ध असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

३. जो ख्रिस्ती बनत नाही, त्याला दोनदा मारा आणि रक्त येईपर्यंत मारा, देव त्याला क्षमा करेल. (पाद्रयांना शांततेचा पुतळा समजणार्‍यांना चपराक ! अशा पाद्रयांवर कधी चित्रपट बनवले जातील का ? त्यांना अशा रूपात दाखवले जाईल का ?- संपादक)

४. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात मी हिंदूंना ख्रिस्ती साहित्य वाटले, त्यामुळे मला तिथून हाकलले गेले; पण यामुळे माझ्या मोहिमेला आणखी प्रेरणा मिळाली. (हिंदु सर्वधर्मसमभाव ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर अन्य धर्मीय हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्नरत असतात ! – संपादक)

५. हे राष्ट्र ख्रिस्ती आहे. २०० वर्षांपूर्वी येथे हिंदु नावाचा धर्मच नव्हता. हिंदु हा राजकीय हेतूसाठी बनवलेला बनावट संप्रदाय आहे. मुसलमान हे सहन कसे करत आहेत ?, तेच कळत नाही. (ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी याविषयी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

कोण होता एज्रा सरगुनम् ?

एज्रा सरगुनम् हा ‘ईव्हँजेलिकल चर्च ऑफ इंडिया’चा माजी प्रमुख होता. त्याने देशभरात चर्च स्थापनेसाठी एक मोठे प्रचार अभियान राबवले होते. वर्ष २००५ पर्यंत २ सहस्रांहून अधिक चर्च स्थापन करण्यात आले होते आणि वर्ष २०५६ पर्यंत १ लाख चर्च स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एज्रा याने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि हिंदूंविरुद्ध अत्यंत अपमानास्पद वक्तव्ये केली होती.

वर्ष २०१८ मध्ये एका भाषणात त्याने ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ या कट्टर इस्लामी पक्षाला हिंदूंच्या विरोधात उघडपणे चिथावले होते. त्या वेळी धर्मांतराच्या विरोधात बोलणारे पट्टाली मक्कल कत्छ पक्षाचे (सर्वहारा जनता पक्षाचे) कार्यकर्ते रामलिंगम् यांची हत्या झाली होती.

संपादकीय भूमिका

  • असे केवळ भारतात आणि हिंदूंच्या संदर्भात जन्महिंदूंकडूनच होऊ शकते !
  • हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे ?, याचे हे एक जिवंत उदाहरण होय !