
जळगाव, २२ जुलै (वार्ता.) – सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर राम मंदिर येथे झाले. या शिबिरात युवतींना लाठी-काठी, दंड साखळी, कराटे आणि क्षणात बचावाचे तंत्र यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात पाळधी परिसरातील ६० हून अधिक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी युवतींना प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले. भारताचा गौरवशाली इतिहास, भारताने लावलेले शोध, तसेच संत परंपरेचा सामाजिक जीवनावरील प्रभाव याविषयी मार्गदर्शन करून राष्ट्ररक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court