राज्यात अशा काही गोशाळा आहेत, ज्या शासनाचे अनुदान घेत नाहीत; मात्र आजही त्या तेवढ्याच सक्षमपणे गोवंश पालनाचे काम करतात. अशांपैकीच ‘श्री पांजरपोळ संस्था, शाहूपुरी, कोल्हापूर’ हीसुद्धा एक संस्था आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी वर्ष १९०६ मध्ये स्थापन केलेल्या या गोशाळेत सध्या २५० गोवंश असून अन्य १५० जनावरे आहेत. ‘श्री पांजरपोळ’ या संस्थेची ज्योतिबा डोंगराजवळ ४५० एकर भूमी आहे. तेथील डोंगरावर पावसाद्वारे येणार्या पिकातून चार्याची व्यवस्था करण्यात येते. श्री. अरविंद वर्धमाने हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष असून माजी अध्यक्ष श्री. रमणभाई पटेल यांचेही या गोशाळेसाठी मोठे योगदान आहे. याखेरीज संस्थेच्या होऊन गेलेल्या अनेक संचालकांचेही योगदान वेळोवेळी लाभलेले आहेच.

ही संस्था दानशूर लोकांच्या सहकार्यावर आणि ‘कोल्हापूर गूळ व्यापारी असोसिएशन’च्या सभासदांच्या सहकार्यातून चालते. प्रत्येक वर्षी संस्थेचे लेखापरीक्षण धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात येते. संस्थेचे गोवंश आणि प्राणी यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी, कुशल कर्मचारीवर्ग नेमला असून वृद्ध अन् आजारी गोवंश, तसेच अन्य प्राण्यांसाठी सुसज्ज चिकित्सालय बांधले आहे. गोवंशियांसाठी ८ प्रशस्त शेड असून त्यांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी मोकळे सोडले जाते. पांजरपोळमध्ये दूध देणार्या गोवंशियांची संख्या अत्यल्प आहे.
संकलक : श्री. अजय केळकर, कोल्हापूर

१. वर्षभरातील उत्सव !
पांजरपोळ संस्थेत श्रीकृष्णाचे छोटेसे मंदिर असून श्रीकृष्णाची अत्यंत आकर्षक मूर्ती येथे आहे. वर्षभरात श्रीकृष्णजन्माष्टमी, वसुबारस हे सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या मंदिरात प्रत्येक गोवंशाला ऐकू येईल असे नमोकार मंत्र (जैन पंथातील मंत्र), गायत्री मंत्र असे नेहमी चालू असते. यामुळे संपूर्ण वातावरण पवित्र आणि प्रसन्न रहाते. श्रीकृष्णजन्माष्टमीला श्रीकृष्णाची पालखी काढण्यात येते. ही पालखी श्री पांजरपोळ, शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर आणि श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर अशी काढण्यात येते.
२. गोमूत्र आणि शेणखत !
संस्था गायींचे गोमूत्र गोळा करते आणि ज्या गरजू नागरिकांना ते हवे आहे, ते घेऊन जातात. संस्थेच्या वतीने गोमूत्र नि:शुल्क देण्यात येते. येथील गोवंशियांपासून मिळणारे दूध परिसरात मंदिरे, रुग्ण, लहान मुले यांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येते. गायींच्या शेणापासून येथे उत्तम दर्जाचे शेणखत सिद्ध करून ते विकले जाते. येथे रहाणार्या कर्मचार्यांसाठी संस्थेने खोल्या बांधून दिल्या आहेत. पशूवैद्यकीय अधिकारी श्री. राजकुमार बागल यांची आता तिसरी पिढी येथे कार्यरत आहे.

३. गोसेवेचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजना
अ. घासचार्याचा लाभ : १ लाख रुपये – वर्षातील १ मास संपूर्ण घासचार्याचा लाभ मिळेल. संस्थेच्या प्रांगणात दर्शनी ठिकाणी १ वर्षासाठी मोठ्या फलकावर नाव लिहिण्यात येईल.
आ. घासचार्यासाठी कायम मीती : ११ सहस्र रुपये – लाभार्थ्याच्या सूचनेनुसार वर्षातील ठराविक मितीला एका दिवसाकरता घासचार्याचा लाभ मिळेल.
इ. वार्षिक गाय दत्तक योजना : ६ सहस्र १०० रुपये
ई. घासचार्याकरता एक दिवसाचा लाभ : ११ सहस्र रुपये
अशा विविध योजना उपलब्ध आहेत.
‘श्री पांजरपोळ संस्था, शाहूपुरी, कोल्हापूर’, ही संस्था शासनाकडून अनुदान घेत नसल्याने नागरिक, तसेच गोप्रेमी यांनी निधी पाठवावा’, असे आवाहन संस्थेने केले आहे.
| या गोशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कत्तलीसाठी नेलेल्या आणि वाचवलेल्या गोवंशियांसमवेत अनेक शेतकरी त्यांचे भाकड, वयस्कर गोवंश, तसेच अन्य प्राणीही या गोशाळेत सोडून जातात. यानंतर या वयस्कर गोवंशांचा, प्राण्यांचा येथे त्यांचा मृत्यू होईपर्यंत सांभाळ करण्यात येतो. याचसमवेत अपंग, रुग्णाईत गायींचाही येथे सांभाळ करण्यात येतो. गोशाळेची ज्योतिबा डोंगराजवळ भूमी आहे, तिथे या गोवंशियांवर, तसेच अन्य प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात !
– श्री. अजय केळकर |
आर्थिक, तसेच अन्य साहाय्यासाठी आवाहन !सद्यःस्थितीत गायींचा सांभाळ करण्यासाठी साधारणत:२० लोक येथे असून महिन्याचा एकूण सर्वसाधारण व्यय हा ६ ते ७ लाख रुपये आहे. त्यामुळे नागरिक, तसेच गोप्रेमी देणगीसमवेत गाय-वासरे यांना लागणारी औषधे, गहू भुसा, पेंड, गूळ, ओले गवत हेसुद्धा अर्पण स्वरूपात संस्थेला देऊ शकतात. संस्थेचा पत्ता : १२९१ ई, शाहू मिलच्या मागे, राजारामपुरी ७ वी गल्ली, कोल्हापूर दूरभाष क्रमांक : (०२३१) २६९२ ८७२, ३२५३ ६७६ अधिकोषाची माहिती : ‘श्री पांजरपोळ संस्था’, बँक ऑफ बडोदा RTGS/NEFT IFSC CODE – BARBOSHAHUP |

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !