अनेक कावड यात्रेकरू घायाळ

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराजच्या मऊआइमा तालुक्यातील सराय ख्वाजा गावात शुक्रवार, १८ जुलै या दिवशी कावड यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी तलवारी आणि काठ्या यांसह आक्रमण केले. येथे नमाजपठण चालू असतांना कावड यात्रेत डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजवण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून हे आक्रमण झाले. पोलिसांनी १५ ज्ञात, तर ६५ अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बेलाल उपाख्य बब्बू, तुफैल अहमद, महंमद तस्लीम, महंमद आरिफ, शाहबे आलम आणि गुड्डू उपाख्य अहमद अली यांना अटक केली आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
🚨 Kanwar Yatra attacked with swords & sticks in Mu$l!m-majority village of Prayagraj, Uttar Pradesh
🩸 Multiple Kanwar pilgrims injured
📍 In Hindu-majority India, Mu$l!ms live freely in every state, district, city & village—yet repay that freedom by attacking Hindus. In… pic.twitter.com/cpIJ5c0oTY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2025
घटनेच्या वेळी काही कावड यात्रेकरूंना तलवार दाखवून धमकावले गेले, तर अनेकांना मारहाण झाली. यात काही कावड यात्रेकरू घायाळ झाले. डीजे बलपूर्वक बंद पाडण्यात आला. या गावात अनुमाने ६० टक्के मुसलमान असून ते नेहमीच स्थानिक हिंदूंवर दबाव आणत असतात.
मुसलमानांकडून नियोजित आक्रमण !
१. गावकरी राजेंद्र कुमार यांनी सांगितले की, आमचे घर मुसलमानांच्या वस्तीत आहे. आमचे दुकानही तिथेच आहे. गेल्या आठवड्यापासून अयान, झिशान, महंमद राजू आणि तौफीक आम्हाला सतत विचारत होते की, कावड यात्रा कधी निघणार, किती वाजता निघणार ? आम्ही डीजेसह यात्रेसाठी बाहेर पडल्यावर लगेच आक्रमण झाले. हे सर्व आधीपासूनच नियोजित होते.
२. स्थानीय महिला उष्मिला देवी यांनी सांगितले की, ही पूर्ण घटना आधीपासून आखलेली होती. म्हणूनच ते लोक आधीपासून तलवारी आणि लाठ्या यांसह सिद्ध होते. आमच्या धार्मिक कार्यक्रमांना नेहमी अडथळे आणले जातात.
३. सुनीता देवी म्हणाल्या की, वीज दुरुस्तीच्या निमित्तानेही त्यांनी वाद घातला. एकदा तर माझ्या मुलीला बलपूर्वक उचलून नेऊन मारहाण केली.
४. सोनू पासी यांनी सांगितले की, मोहरमसाठी ४-५ दिवस सतत डीजे वाजवले जातात, शाळा बंद होतात; पण हिंदूंचे सण आले की, ते लोक नेहमीच गोंधळ घालतात.
संपादकीय भूमिका
|
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती