पंढरपूर येथील गोशाळेत नवजात वासरू मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण !

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेत कर्मचारी योगेश सुधाकर पाठक आणि तानाजी रामचंद्र जाधव यांनी २ दिवसांच्या नवजात वासरास बळजोरीने दूध पाजले होते. यात त्या वासराचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना उत्तरदायी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोशाळा विभागाचे प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही कर्मचार्यांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३२५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. नवजात वासरू दूध पित नसल्याने या कर्मचार्यांनी नवजात वासराची मान बळजोरीने हातात धरून ती दुधाच्या भांड्यात बुडवली आणि यानंतर काही वेळातच या वासराचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता.
२. यानंतर संबंधित कर्मचार्यांवर गुन्हा नोंद होण्यासाठी गोरक्षकांनी आंदोलन केल्यानंतरही मंदिरे समितीने प्रारंभी कोणतीच कारवाई केली नव्हती. अंततः समाजिक माध्यमांमध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर आणि ठिकठिकाणी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मंदिरे समितीने कारवाई केली.
३. मंदिरे समितीच्या आगामी सभेत सदर विषय मांडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.
४. मंदिरे समितीच्या या गोशाळेत गायींची हेळसांड झाल्याचा हा पहिला प्रकार नसून वर्ष २०१८ मध्येही गायींना चारा न मिळाल्याने त्या गायींनी गावातील उकीरड्यावरील कचरा खाल्ल्याने गायींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात गेल्याने काही गायींचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता.
संपादकीय भूमिका
|
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !