
ठाणे – अंबरनाथ येथील चिंचपाडा भागातील खदान परिसरात कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळून आले. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील हे अवशेष पाहून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अज्ञातांनी गोवंशाची हत्या करून पुरावे लपवण्याच्या उद्देशाने ते येथे टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई कधी करणार ? – संपादक)
काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांसविक्री आणि अवैध पशूवधगृहे यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवून अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत. (असे घडते, याचा अर्थ गोहत्या करणार्यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलिसांची कारवाई थांबली की, ते सक्रीय होतात, हे सिद्ध होते. – संपादक)
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !