
बीजिंग (चीन) – चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे बांधकाम चालू केले आहे. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी १९ जुलैला या बांधकामाचे उद्घाटन केले. तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्या सीमेवरील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जात असून यावर १२ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. यावर ५ जलविद्युत् केंद्रे असतील. या प्रकल्पातून प्रतिवर्षी ३०० अब्ज किलोवॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती होईल. ही वीज ३० कोटी लोकांच्या गरजा पूर्ण करू शकते. या धरणाला भारत आधीपासूनच विरोध करत आहे, तर बांगलादेशानेही यावर चिंता व्यक्त केली आहे.
🚨 China begins building the world’s biggest dam on the Brahmaputra River 💧⚡
🇨🇳 A strategic move to block water & pressure 🇮🇳 India
💰 ₹12 lakh crore project
🏔️ Located near Arunachal-Tibet border
⚠️ Earthquake-prone zone
⚡ 300B+ kW power annually
👥 Impacts 30 crore… pic.twitter.com/E6B2u4ZdVU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2025
का होत आहे विरोध ?

तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर हिमालयाच्या एका विस्तीर्ण दरीत हे धरण बांधले जाईल. या भागात वारंवार भूकंप होतात. धरणाच्या बांधकामामुळे परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे अनेक अपघात होऊ शकतात.
भारत आणि बांगलादेश येथील ईशान्येकडील राज्ये आधीच पूरग्रस्त परिस्थितींना तोंड देत आहेत. त्यांना हवामान बदलामुळे भूस्खलन, भूकंप आणि पूर इत्यादी आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ३ जानेवारी २०२५ या दिवशी पत्रकार परिषदेत या धरणावर आक्षेप घेतला होता. ब्रह्मपुत्रेवर धरण बांधल्याने नदीच्या खालच्या भागातील राज्यांना हानी पोचू नये, असे भारताने म्हटले होते.
संपादकीय भूमिकाधरणाद्वारे पाणी अडवून भारताला कोंडीत पाकडण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. तो आक्रमकरित्या हाणून पाडण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक ! |
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif