‘बांगलादेशात काफिरांना जागा नाही’, अशाही दिल्या घोषणा

ढाका (बांगलादेश) – शहरातील ‘राष्ट्रीय मशीद’ म्हणून ओळखली जाणारी बैतुल मुकर्रम या मशिदीच्या परिसरात हिज्ब उत-तहरीर, विलायाह बांगलादेश, अंसार अल्-इस्लाम आणि जमात-ए-इस्लामी यांसारख्या कट्टरतावादी इस्लामी जिहादी संघटनांच्या सदस्यांनी उघडपणे ‘जिहाद’च्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
🚨 Jihadi Slogans Outside Dhaka Mosque!
Radical Muslims in Bangladesh raised chants like:
🗣️ “No place for kafirs in Bangladesh” outside Baitul Mukarram Mosque!This open hate speech exposes the dangerous rise of Islamist extremism.
🔴 Hindus in Bangladesh face an existential… pic.twitter.com/Xz1GHbgXbU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2025
त्यासमवेत त्यांनी स्वतःला ‘जिहादी’ संबोधले. या जिहादी गटांचे सदस्य विविध जिल्ह्यांतून आले होते. त्यांनी नमाजानंतर मशिदीबाहेर ‘जिहाद पाहिजे, जिहाद करत जगायचे आहे’, ‘आम्ही कोण आहोत ?…आतंकवादी, आतंकवादी’, ‘इस्लामिक बांगलादेशामध्ये काफिरांना जागा नाही’, अशा घोषणा दिल्या.

१. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरकारच्या काळात या संघटनांना देशभरात बाँबस्फोट घडवणे आणि ठिकठिकाणी आतंकवादी कारवाया घडवून आणणे, यांप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. कागदोपत्री आजही या संघटनांवर बंदी आहे; मात्र पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर या संघटना उघडपणे सक्रीय झाल्या आहेत.
२. बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सत्तांतर झाले. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार, आतंकवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या शेकडो लोकांना जामिनावर सोडण्यात आले आहे.
३. कारागृह विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ३०० हून अधिक आतंकवादी कारागृहातून बाहेर आले आहेत. त्यांपैकी काहींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !