
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका परीक्षेच्या संदर्भातील बुरखा घातलेल्या महिलेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओत ही महिला परीक्षा केंद्राच्या बाहेर रिक्शात बसून वॉकी-टॉकी (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) आणि ‘टॅब’च्या (लहान संगणक) यांच्या साहाय्याने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला उत्तरे पुरवत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी कशा प्रकारे तिच्याकडून उत्तरे मिळवत होती ?, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मध्यप्रदेश प्रशासनाने या व्हिडिओची तातडीने नोंद घेत उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अधिक कडक पाळत ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवणे आणि अपप्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, अशा काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !