|

बीजिंग (चीन) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १४ जुलैला चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकीत जयशंकर म्हणाले की, ऑक्टोबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. तेव्हापासून उभय देशांच्या संबंधांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे. अशात भारत आणि चीन यांसारख्या मोठ्या शेजारी देशांमधील मुक्तसंवाद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
१. जयशंकर हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीन दौर्यावर आहेत. यंदा संघटनेच्या अध्यक्षपदी चीन असून भारताचा यासाठी पाठिंबा असल्याचेही जयशंकर म्हणाले.

२. जयशंकर यांचा ५ वर्षांत हा पहिलाच चीन दौरा आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात चीनला भारताचे राजदूत म्हणून जयशंकर हे सर्वाधिक काळ राहिलेले प्रशासकीय अधिकारी आहेत. ते ४ वर्षे ४ महिने आणि २ दिवस (१२ ऑगस्ट २००९ ते १४ डिसेंबर २०१३) चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहेत.
३. परराष्ट्रमंत्री १५ जुलैला तियानजिन येथे होणार्या शांघाय सहकार्य संघटनेच्या अंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या वेळी ते चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचीही भेट घेणार आहेत. याआधी दोघे नेते ऑस्ट्रेलियाच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या जी-२० बैठकीच्या वेळी भेटले होते.
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प