
सातारा जिल्ह्यामध्ये एका टोकाला कमालीचा पाऊस, तर दुसर्या टोकाला भीषण दुष्काळ, अशी विचित्र भौगोलिक स्थिती पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील माणखटाव तालुक्यात पशूधन वाचवण्यासाठी चारा छावण्या, तर मनुष्यजीवन वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड पाऊस असल्यामुळे तेथील सामान्य जनजीवन नेहमीच विस्कळीत होते. पाटण तालुक्यातही पर्जन्यमानाची अशीच स्थिती असते. कोयना धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे कोयना आणि केरा या नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्याही वर जाते. कोयना काठासह पाटण शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्यामुळे नागरिक घरातच अडकून पडतात. त्यामुळे केरा पुलाजवळ असणारा पूल, नवीन बसस्थानक, बाजाराचा परिसर, ग्रामपंचायतीची जुनी इमारत असा पुष्कळ मोठा परिसर पुराच्या पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढतांना प्रशासकीय यंत्रणेची मोठी दमछाक होते.
सातारा जिल्ह्याला ४ कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाई येथील आमदार मकरंद पाटील यांच्याकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्रीपद आहे. ही सातारा जिल्हावासियांसाठी जमेची बाजू आहे. मंत्री पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आपत्तीप्रवण क्षेत्रातील समस्त नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याची सुविधा सहज उपलब्ध होऊ शकते; परंतु यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. आपत्तीमध्ये केवळ शासन आणि प्रशासन यांवर अवलंबून न रहाता नागरिकांनीही ‘स्व’साहाय्यासाठी सिद्ध असणे आवश्यक आहे. काही वेळा शासनाचे साहाय्य पोचू शकले नाही, तर नागरिकांना त्यांचे संरक्षण करता येणे आवश्यक आहे.

स्वतःसह आपल्या प्रियजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन करता येणे, हे अत्यंत आवश्यक आहे. आपत्कालीन स्थिती हाताळता आल्यास आपण स्वतःसमवेत इतरांचाही जीव वाचवू शकतो. यामध्ये पोहणे, बोट चालवणे, पाण्यातून दोरीला धरून चालवणे या सर्वांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, संबंधित ग्रामपंचायती, नागरिक, विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’च्या चमूकडून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अशी आपत्ती उद्भवल्यास नागरिकांना बोटीने बाहेर काढणे सोयीस्कर होईल. प्रशासनाकडून आपत्ती नियंत्रण कक्ष चालू करण्यात आला असला, तरीही स्थानिक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिल्यास तात्काळ मानवी जीवन वाचवण्यास साहाय्य होणार आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !