‘महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या स्वयंभू आणि जागृत श्री शनैश्चर देवस्थानाची विश्वस्तांनीच लूट केल्याचा दुर्दैवी प्रकार विधानसभेत उघड झाला. विश्वस्तांनी २ सहस्रांहून अधिक बोगस कर्मचार्यांची नियुक्ती करून देवस्थानाच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांप्रमाणे श्री शनैश्चर देवस्थानावर समिती नियुक्त करण्याचा विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात दिली.’
संपादकीय भूमिकाव्यवस्थापन सुधारण्याच्या नावाखाली शनैश्चर मंदिराचे सरकारीकरण करण्यात आले होते; मात्र सरकारीकरणाचा दुष्परिणाम येथे दिसून येत आहे. हे मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून ते भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे ! |

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शनिशिंगणापूर देवस्थान गर्दीवर नियंत्रणासाठी वास्तूविशारद नेमणार