सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना !

नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दर्शनव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजनेच्या कामासाठी शनिशिंगणापूर देवस्थान आता वास्तूविशारद नेमणार आहे. यासाठी शिर्डी संस्थानचेही साहाय्य घेणार आहे. सिंहस्थ कुंभपर्व सोहळा हा साधारण १८ महिने चालणार असल्याचे यापूर्वी घोषित केले आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी प्रतिदिन किमान ३ ते ४ लाख भाविक येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांसाठी मुख्य असलेल्या दर्शन बारी, एक दर्शनरांग, भाविकांना थांबण्यासाठी तंबू उभारणी, वाहनतळ काँक्रिटीकरण, भक्तनिवास नूतनीकरण यांसह विविध कामे करण्यासाठी शनी देवस्थान वास्तूविशारद नेमणार आहे. सध्या शनिशिंगणापूर देवस्थानावर नाशिक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे प्रशासक आहेत. देवस्थानकडून विकासकामांसाठी २० ते २५ कोटी रुपयांचा आराखडा प्राथमिक स्वरूपात सिद्ध करण्याचे काम चालू केले असून देवस्थान कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी प्राथमिक विकास आराखड्यास दुजोरा दिला आहे.
वैभववाडी येथे ६ गोवंशियांची अवैध वाहतूक रोखली
भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्यात चर्च संस्थेच्या २ फादरांविरुद्ध भूमी घोटाळ्यात आरोपपत्र प्रविष्ट
कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री