मोशी (पुणे) येथील दुर्घटनेच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठकीला भाजपचे आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी

पुणे – मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेत सविस्तर आढावा घेतला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व साहाय्य तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी मोशी येथील ‘लेगसी वेस्ट’च्या ‘बायोमायनिंग’ (साचलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यावरील शास्त्रोक्त) प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे आदेश दिले. तसेच प्रतिदिन जमा होणार्‍या अनुमाने १०० टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा तातडीने उभारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या आढावा बैठकीला भाजपचे आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.