
ढाका (बांगलादेश) – ‘बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषद’ या संस्थेने घोषित केले आहे की, ४ ऑगस्ट २०२४ पासून गेल्या ३३० दिवसांत हिंदूंवर एकूण २ सहस्र ४४२ हिंसक घटना घडल्या आहेत. यात सामूहिक बलात्कार आणि इतर लैंगिक अत्याचार, पूजास्थळांवर आक्रमणे, घरे अन् व्यवसाय बळकावणे यांसारख्या घटना घडल्या. या काळात बांगलादेशात राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात होती आणि पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ताच्युत करण्यात आले होते.
परिषदने स्पष्ट केले की, ४ ऑगस्ट २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतच २ सहस्र १८४ घटना नोंदवल्या गेल्या आणि वर्ष २०२५ च्या पहिल्या ६ महिन्यांत आणखी २५८ हिंसक घटना घडल्या.
२. वर्ष २०२५ मध्ये झालेल्या घटनांमध्ये, २० बलात्कार, ५९ वेळा हिंदु मंदिरांवर आक्रमणे आणि १२ वेळा आदिवासी समाजावर आक्रमणे, अशा घटना घडल्या.
३. परिषदचा आरोप आहे की, सरकारने या घटनांना ‘खोटे’ ठरवून त्या फेटाळल्या. त्यामुळे गुन्हेगारांना आणखी बळ मिळाले आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले. हिंसाचाराच्या ८८ घटनांमध्ये केवळ ७० लोकांना अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशात हिंदु सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय !
वर्ष २०२२ च्या जनगणनेनुसार बांगलादेशात सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय हा हिंदु आहे. हिंदूंची लोकसंख्या जवळपास ७.९५ टक्के आहे. त्यानंतर बौद्ध (०.६१ टक्के) आणि ख्रिस्ती (०.३० टक्के) आहेत. ‘बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषद’ ही अल्पसंख्यांकांसाठी वर्ष १९६० च्या दशकात स्थापन करण्यात आलेली जुनी संस्था आहे. तेव्हापासून ती धार्मिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवत आहे.
संपादकीय भूमिका
|
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची केली घोषणा !
Kerala Student Murder : उझबेकिस्तानमध्ये धर्मांतरास नकार दिल्याने धर्मांध मुसलमानाकडून केरळम्स्थित तरुणीची हत्या
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप