
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूवर वारंवार अत्याचार होत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.व्हाय. विजयेंद्र यांनी केला. त्यांनी हावेरी जिल्ह्यातील रेट्टीहळ्ळी येथे अलीकडेच हत्या झालेले शिवाजी राव बायरोजी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना विजयेंद्र म्हणाले की, गेल्या आठवड्यात नरेगलमध्ये बैलांच्या शर्यतीच्या वेळी फटाके फोडल्याच्या कारणावरून लोहित कुरुबर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर आक्रमण करण्यात आले होते. गेल्या ६० वर्षांपासून दुकान चालवणारे शिवाजी राव यांना १०० रुपये देऊन ५०० रुपये दिल्याचा खोटा दावा करून भांडण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही केवळ वैयक्तिक घटना नाही. या हत्येमागे एक सुनियोजित कारस्थान आहे, असा आरोप विजयेंद्र यांनी केला.
येल्लापूरमध्ये ‘लव्ह जिहाद’मुळे एका हिंदु महिलेची क्रूरपणे हत्या झाली. काँग्रेस सरकारच्या अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याच्या धोरणामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळाले आहे. गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्याता धमक असेल, तर त्यांनी अशा घटनांना उत्तरदायी असणार्यांना पकडून कारवाई करावी, असे आव्हान विजयेंद्र यांनी दिले.
Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या ७० घटना सीसीटीव्हीमध्ये झाल्या चित्रीत !
कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला संघाच्या नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस
Muzaffarpur Love Jihad : बिहार – महंमद अरमान याने स्वतः सैनिक असल्याचे सांगून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !