‘बांगलादेशात परत गेल्यास मला मारले जाऊ शकते’, अशी भीतीही व्यक्त केली !

नवी देहली – ते मला अटक करू शकतात, मला मारूही शकतात; पण तरीही मी परत जाईन, अशा शब्दांत बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, त्या डिसेंबर २०२६ च्या सुमारास बांगलादेशात परत जातील आणि न्यायालयात आत्मसमर्पण करतील. त्यांनी ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला दूरभाषवरून दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. २ वर्षांपूर्वी बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेने केलेल्या हिंसाचारानंतर त्यांना देश सोडून भारतात शरण घ्यावी लागली आहे.
मुलाखतीत शेख हसीना यांनी म्हटले आहे, ‘मी बांगलादेशाला परतताच ते मला अटक करू शकतात, ते मला मारूही शकतात; परंतु मला जावेच लागेल. जर माझा मृत्यू झाला, तर तो माझ्या देशाच्या भूमीवर व्हावा, जिथे माझे आई-वडील दफन आहेत. माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्रचंड दडपशाही होत आहे.’
Kerala Student Murder : उझबेकिस्तानमध्ये धर्मांतरास नकार दिल्याने धर्मांध मुसलमानाकडून केरळम्स्थित तरुणीची हत्या
Bangladesh Temple Attack : बांगलादेशातील जुन्या श्री कालीमाता मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील हिटलरचा संदर्भ हटवला
Minority Youth Skill Training : धर्मनिरपेक्ष भारतात केंद्रातील भाजप सरकारचे अल्पसंख्य धर्मियांच्या तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
US Iran War : अमेरिकेचे इराणच्या चाबहार बंदरावर आक्रमण
PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !