‘ऑपरेशन सिंदूर’विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले

चेन्नई – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी वक्तव्य करतांना म्हटले की, ‘या ऑपरेशनच्या वेळी भारताची हानी झाली’, असे म्हणणार्यांनी ‘हानी झाल्याचे छायाचित्र दाखवावे.’ अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच यात भारताचे मोठ्या प्रमाणात हानी झाली, अशा बातम्या छापल्या. या पार्श्वभूमीवर ‘आयआयटी मद्रास’ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना डोवाल यांनी हे वक्तव्य केले आहे.
🎯 “Show Us the Proof!” – Ajit Doval Hits Back! 🇮🇳
Ajit Doval slams foreign media over Operation Sindoor:
🗣️ “Show one photo proving India suffered losses!”💥 Says 9 Pak terror bases hit with indigenous precision tech
💪 “India has stood strong for thousands of years!”… pic.twitter.com/iXavbpZ7qF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2025
ते पुढे म्हणाले की,

१. तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो. आम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभिमान आहे. आम्ही या कारवाईच्या वेळी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलीकडे असलेल्या ९ पाकिस्तानी तळांवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्यांपैकी सीमावर्ती भागात एकही तळ नव्हता. आमचे सर्व लक्ष्य अचूक होते. आम्ही केवळ आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
२. तुम्ही अशा देशात वास्तव्य करतात, ज्याची संस्कृती सहस्रो वर्षांपासून संकटात आहे. आपल्या पूर्वजांनी पुष्कळी काही सहन केले आहे. राष्ट्राची ही संकल्पना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना किती अपमान आणि दुःख सहन करावे लागले असेल ?, हे मला ठाऊक आहे. भारत एक राष्ट्र म्हणून सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात आहे.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन