आतंकवादी मसूद अझहर याची भारताला धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आतंकवाद्यांना देण्यात आलेल्या निधीचा उपयोग जिहादसाठी करण्यात येईल. पाकिस्तानला आतंकवाद्यांच्या आशीर्वादाची तितकीच आवश्यकता आहे, जितकी मोठ्या धार्मिक नेत्यांना आहे. आमच्याकडे आत्मघाती आक्रमणे करणारे अनेक जण आहेत. कोणतेही क्षेपणास्त्र त्यांचे काहीही वाईट करू शकणार नाही. आमच्याकडे ३० सहस्र कार्यकर्ते आहेत. जैश-ए-महंमदकडे जिहादसाठी आत्मघाती आक्रमण करणारे १० सहस्र आतंकवादी आहेत, अशी धमकी देणारा जैश ए महंमदचा संस्थापक प्रमुख असणारा आतंकवादी मसूद अझहर याचा ऑडिओ प्रसारित झाला आहे.
🎙️ “No missiles can stop them” – JeM Chief Masood Azhar threatens that 10,000 Fidayeens are “ready for Jihad” from Pakistan 🇵🇰💣
In an audio from Bahawalpur mosque, he boasts of 30,000 militants under JeM!
💥 Indians demand our forces cross the border again and wipe out the… pic.twitter.com/mhPPRh699c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2025
ही धमकी भारताला देण्यात आली आहे. ही धमकी पाकच्या बहावलपूर येथील मरकज सुभान अल्ला या जैशच्या मुख्यालयातून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने या मुख्यालयावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले होते. या मसूद अझहर याच्या भावासह १० हून अधिक नातेवाईक ठार झाले होते.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार मसूद याची ही धमकी समोर आणणे, हे पाकिस्तानकडून रचण्यात आलेले मोठे कारस्थान आहे. भारतात अमरनाथ यात्रा चालू असल्याने ही धमकी प्रसारित करून यातून आतंकवाद्यांना चिथावणी दिली जात आहे.
संपादकीय भूमिकाभारताने पाकमध्ये पुन्हा घुसून या तथाकथित १० सहस्र आतंकवाद्यांना ठार करावे, असेच भारतियांना वाटते ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण