Rafale Downing Claim : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे भारताचे एक राफेल विमान कोसळले !

फ्रान्समधील ‘दसॉल्ट एव्हिएशन’चे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर यांनी दिली माहिती

‘दसॉल्ट एव्हिएशन’चे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर

पॅरिस (फ्रान्स) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताचे एक राफेल लढाऊ विमान उंचीवर जाऊन तांत्रिक बिघाडामुळे खाली कोसळले ; परंतु पाकिस्तानकडून एकही राफेल विमान पाडण्यात आले नाही, अशी माहिती या विमानांची निर्मिती करणार्‍या फ्रान्समधील ‘दसॉल्ट एव्हिएशन’ आस्थापनाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी दिली. पाकिस्तान सातत्याने दावा करत होते की, पाकिस्तानच्या ‘जे-१० सी’ लढाऊ विमानाने ‘पीएल-१५ इ’ या क्षेपणास्त्रांचा मारा करत भारताचे विमान पाडले; परंतु त्यासंदर्भातील एकही पुरावा पाकिस्तान देऊ शकला नाही.

एरिक ट्रॅपियर पुढे म्हणाले की, राफेल विमान कसे पडले ? त्याची चौकशी केली जात आहे. फ्रान्सने ८ देशांना हे विमान विकले आहे; परंतु कुठेही राफेलची हानी झाली नाही.