Sharan Pumpwell : स्वतंत्र भारतात हिंदूंवर अन्याय : हिंदुत्वनिष्ठ नेते शरण पंपवेल यांना १ महिन्यासाठी ‘चिक्कमगळूरु जिल्हा’बंदी !

प्रक्षोभक भाषण देत असल्याचे दिले कारण

हिंदुत्वनिष्ठ नेते शरण पंपवेल

चिक्कमगळूरु (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ नेते शरण पंपवेल यांना ६ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत ३० दिवसांसाठी चिक्कमगळूरुमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मीना नागराज यांनी असा आदेश प्रसारित केला आहे. पंपवेल यांना चिक्कमगळूरु, मुदिगेरे आणि आल्दूरु येथे बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

‘पंपवेल यांच्याविरुद्ध २२ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीमुळे ‘प्रभावी व्यक्ती’ म्हणून शरण पंपवेल प्रसिद्ध आहेत. प्रशासनाने म्हटले आहे की, ‘शरण पंपवेल जातीय द्वेष पसरवणारी भाषणे करतात. त्यांची कथित प्रक्षोभक भाषणे, तसेच ते अनेकदा दंगलीसम घटनांमध्ये दिसले आहेत. द्वेषपूर्ण भाषण करणार्‍यांविरुद्ध राज्य सरकार कठोर कारवाई करत आहे. याच कारवाईचा भाग म्हणून पंपवेल यांना ३० दिवसांसाठी चिक्कमगळूरु जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.’ (धर्मांधतेच्या आहारी जाऊन मुसलमान आणि ख्रिस्ती नेते हिंदूंवर अत्याचार करतात. अशा किती नेत्यांवर अशी कारवाई केली आहे, हे कर्नाटक पोलीस कधीच सांगणार नाहीत, हेही तितकेच खरे ! – संपादक)

चिक्कमगळूरुसह काही शहरे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. कोणतीही छोटी घटना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करू शकते. त्यामुळे पुढील ३० दिवसांसाठी पंपवेल यांना चिक्कमगळूरु जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदु नेत्यांवरच अशा प्रकारे बंदी लादण्यात येणे निषेधार्ह आहे. खरेतर ही लोकशाहीची विटंबना नि हत्या आहे, हे कर्नाटकातील हिंदूंनी सत्ताधारी काँग्रेसला सांगून तिला धारेवर धरले पाहिजे !
  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी आतंकवादी संघटनेवर असलेली बंदी उठवण्याचे आश्वासन निवडणुकीत देणारी कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस हिंदु नेत्यांवर बंदी घालते, हे लक्षात घ्या !