विज्ञापनात ‘डाबर’च्या च्यवनप्राशला कमी लेखल्याने कारवाई
नवी देहली – ‘च्यवनप्राश’ हे एक पारंपरिक आयुर्वेद औषध आहे, हे औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यातील नियमांनुसार सिद्ध केले पाहिजे. इतर आस्थापनांच्या च्यवनप्राशना सामान्य म्हणणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे, असे सांगत देहली उच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि’ च्यवनप्राशच्या विज्ञापनावर बंदी घातली. ‘पतंजलि’ आस्थापनाने ‘डाबर’ च्यवनप्राशविरुद्ध कोणतेही नकारात्मक किंवा दिशाभूल करणारे विज्ञापन दाखवू नये, असेही निर्देश न्यायालयाने दिले. ‘डाबर’ने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने ही बंदी घातली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै या दिवशी होणार आहे.
काय आहे विज्ञापनात ?
या विज्ञापनात योगऋषयी रामदेवबाबा स्वतः असे म्हणतांना दिसत आहेत की, ज्यांना आयुर्वेद आणि वेद यांचे ज्ञान नाही, ते पारंपरिक च्यवनप्राश कसे बनवू शकतात ?
डाबरने या विज्ञापनावरून म्हटले आहे की, ‘पतंजलीच्या विज्ञापनामध्ये सूचित केले आहे की, इतर आस्थापनांच्या उत्पादनांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या वादग्रस्त विज्ञापनांसाठी सर्वोच्च न्यायालयात ‘पतंजलि’विरुद्ध खटले चालू आहेत. यावरून स्पष्ट होते की, त्यांच्याकडून असे वारंवार होत आहे.’

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !