वारंवार तक्रारी करूनही कचरा गाडी न आल्याने बसपा नेत्याचा संताप !

बारामती – येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही कचरा गाडी न आल्याने बहुजन समाज पार्टी (बसपा) प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी थेट कचरा घेत नगरपरिषद गाठली. त्यांनी चक्क नगरपरिषदेत कचरा टाकत संताप व्यक्त केला. काळूराम चौधरी यांनी नगरपरिषदेतील नागरिक सुविधा केंद्र विभागात जाऊन कचर्याने भरलेल पोतं जमिनीवर रिकामं केले.
या वेळी संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, अनेकदा तक्रारी करूनही कचरा उचलण्यासाठी कोणी येत नाही. आम्ही लाख-लाख रुपये कर भरतो. मात्र बेसिक सुविधा मिळत नाही. तसेच आणखी कचरा नगरपरिषद कार्यालयात टाकला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !