श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करणार्‍यांवर कडक कारवाई करा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

निपाणी तहसीलदार यांना निवेदन देतांना श्रीराम सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

निपाणी – बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील इंगळी या गावामध्ये श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या जिहादी गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहितेनुसार कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निपाणी तहसीलदार यांना श्रीराम सेना कर्नाटक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. गोरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करून झाडाला बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्या घटनेचा ‘व्हिडिओ’ प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करण्यात आली. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

या प्रसंगी सर्वश्री अमोल चेंडके, बबन निर्मले, संतोष मोरे, प्रणव मानवी, विशाल जाधव, अभिमन्यू बलुगडे, चारुदत्त पावले, महादेव बरगाले, राजेश आवटे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.