२ जणांवर गुन्हा नोंद

वैभववाडी – खारेपाटण येथून संकेश्वर (बेळगाव) येथे अवैधरित्या ६ गोवंशियांची वाहतूक करत असल्याच्या प्रकरणी टेंपोचा चालक विवेक शामराव कांबळे (रहाणार निपाणी) आणि त्याचा साहाय्यक रूपेश लहू जाधव (रहाणार राजापूर) या २ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई १० जुलै या दिवशी सकाळी करण्यात आली.
स्थानिक पोलिसांचे पथक भुईबावडा परिसरात गस्त घालत असतांना खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील हेत फाटा येथे वाहनांची तपासणी करत होते. त्या वेळी खारेपाटणहून गगनबावडाच्या दिशेने जाणार्या टेंपोचा संशय आल्याने त्याला थांबवून तपासणी केली. त्या वेळी टेंपोमध्ये ४ गायी आणि २ वासरे, असे एकूण ६ गोवंश अत्यंत दाटीवाटीने भरल्याचे दिसले. याविषयी विचारल्यावर विवेक कांबळे आणि रूपेश जाधव यांनी ‘ही गुरे खारेपाटण येथील इम्रान लतीफ खान यांच्याकडून घेऊन संकेश्वर (बेळगाव) येथे नेत आहोत’, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी टेंपोसह गोवंश कह्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला आणि नंतर गोवंशियांना कुसूर येथील गोशाळेत पाठवण्यात आले.
भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्यात चर्च संस्थेच्या २ फादरांविरुद्ध भूमी घोटाळ्यात आरोपपत्र प्रविष्ट
कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट