‘हलाल’चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि हिंदु हितासाठी ‘पवित्रम् ॲप’ ची निर्मिती यांविषयी मान्यवरांनी केले मार्गदर्शन !

पुणे, १ जुलै (वार्ता.)- ‘लघुउद्योग भारती, पुणे’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रहित आणि उद्योगहित हा उद्देश घेऊन कार्य करत आहे. या माध्यमातून उद्योगांना साहाय्य करणे, उद्योग निर्मिती करणे, उद्योग क्षेत्रात नवीन पिढी सिद्ध करणे यांसारख्या अनेक विषयांवर कार्य करत आहे. नुकतेच या संस्थेच्या नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वा. सावरकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक ‘लघुउद्योग भारती, पुणे’चे कार्यकारी समिती सदस्य श्री. महेश कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश ‘लघुउद्योग भारती’चे अध्यक्ष श्री. शैलेश मनोहर यांनी सांगितला.
या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर आणि ‘पवित्रम् फाऊंडेशन’चे श्री. तुषार कुलकर्णी हे वक्ते म्हणून उपस्थित होते, तसेच लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. अमित घैसास, सचिव श्री. मंदार लेले आणि त्यांचे सदस्य, पवित्रम् फाऊंडेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि जिज्ञासू उपस्थित होते.

कु. क्रांती पेटकर यांनी हलाल जिहादचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि हलालवर बंदी का आवश्यक ? याविषयी उपस्थितांना अवगत केले. त्या वेळी हा विषय खूपच गंभीर असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


अध्यक्ष श्री. शैलेश मनोहर यांनी कु. क्रांती पेटकर आणि श्री. तुषार कुलकर्णी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. कु. क्रांती पेटकर यांनी श्री. तुषार कुलकर्णी यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट दिला. या ठिकाणी ‘हलाल जिहाद’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ या विषयी ग्रंथ कक्ष लावण्यात आला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

| ‘पवित्रम् ॲप’ च्या माध्यमातून हिंदूंचे आर्थिक सबलीकरण शक्य ! – तुषार कुलकर्णी
हिंदुहित साधण्यासाठी पवित्रम् ॲपची निर्मिती केली आहे, हे सांगतांना पवित्रम् फाऊंडेशनचे श्री. तुषार कुलकर्णी म्हणाले की, हिंदूंनी स्वकष्टाने मिळवलेले धन अजाणतेपणी देश विघातक शक्तींकडे कसे पोचत आहे. या धोक्यापासून हिंदूंना जागृत करणे, त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी २ वर्षांपूर्वी पवित्रम् फाऊंडेशनची स्थापना केली. या ॲपच्या माध्यमातून हिंदूंचे आर्थिक सबलीकरण शक्य होऊन राष्ट्रहित साधता येईल. यामधून हिंदूंना पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यांनी ‘पवित्रम् मर्चंट ॲप’ आणि ‘पवित्रम् ॲप’ डाऊनलोड करण्याविषयी आवाहन केले. या ॲपविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. लवकरच या ॲपचे लोकार्पण होईल, असेही त्यांनी सांगितले. |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !