अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची ट्रम्प सरकारवर टीका

वॉशिंग्टन (अमेरिका) – आज जे लोक अमेरिकेचे सरकार चालवत आहेत, ते लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना दुर्बल करत आहेत. लोकशाहीमध्ये सरकारमध्ये आतून आणि बाहेरून चुकीच्या गोष्टींना विरोध असणे महत्त्वाचे आहे; पण आता तसे होतांना दिसत नाही, अशी टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले.
ते अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील हार्टफोर्ड शहरातील एका कार्यक्रमात बोलत होते. ओबामा यांनी अमेरिकेची तुलना हंगेरीसारख्या देशांशी केली, जिथे निवडणुका होतात; पण लोकांच्या आवाजाचा आदर राखला जात नाही आणि नेते मनमानी पद्धतीने वागतात. ओबामा यांनी चेतावणी देतांना म्हटले की, ‘अमेरिकाही अशाच मार्गावर जात आहे, जिथे कायदा आणि लोकशाही यांची खरी भावना दुर्बल होत आहे.’ ओबामा यांनी वर्ष २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचे उदाहरण दिले, ज्यामध्ये बायडेन जिंकले; परंतु पराभूत झालेल्या डॉनल्ड ट्रम्प यांनी फसवणुकीचे खोटे आरोप केले.
संपादकीय भूमिकाअमेरिकेने जगातील किती देशांतील लोकशाही दुर्बल करून तेथे अराजक निर्माण केले ?, याची माहितीही ओबामा यांनी दिली पाहिजे ! तसेच किती हुकूमशाही देशांना साहाय्य करून त्यांना लोकशाहीप्रधान देशांत आतंकवादी कारवायांसाठी प्रोत्साहित केले ?, हेही सांगायला हवे ! |
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !