|

नवी देहली – इस्रायल स्वतः एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे; पण इराणकडे अण्वस्त्रे नसतांनाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ‘द हिंदू’ दैनिकात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
‘इराण भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. गाझामध्ये होत असलेला विध्वंस आणि इराणमधील आक्रमण, यांविषयी भारताने स्पष्ट, दायित्वाने आणि भक्कम आवाजात बोलले पाहिजे. अजूनही फार विलंब झालेला नाही, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
🗣️ “Attacking Iran is hypocrisy!” – Sonia Gandhi slams Israel 🇮🇱 in The Hindu
📌 She also questioned India’s silence on Gaza & Iran.
🇮🇱 But Israel acted in self-defense — its sovereignty was under threat from Iran.
🤔 Why is Congress always silent when Hindus are attacked in… pic.twitter.com/83y3oS6r4i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2025
इस्रायलने शांतता बिघडवण्याचे आणि आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले !
| वाचा → सोनिया गांधी यांचा ‘द हिंदू’ दैनिकात प्रसिद्ध झालेला लेख –
|
या लेखात सोनिया गांधी यांनी पुढे म्हटले की,
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलने सतत शांतता बिघडवण्याचे आणि आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. (सोनिया गांधी यांनी कधी पाकिस्तानविषयी भारताच्या संदर्भात असे विधान केले आहे का ? किंवा लेख लिहिला आहे का ? – संपादक) हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे सरकार सतत अवैध वसाहती वाढवत आहे, अतिरेकी राष्ट्रवादींसमवेत काम करत आहे आणि द्वि-राज्य पर्याय पूर्णपणे नाकारत आहे. यामुळे पॅलेस्टिनी लोकांचे दुःख, तर वाढले आहेच; परंतु संपूर्ण प्रदेश दीर्घकालीन संघर्षाकडेही ढकलला गेला आहे. (सोनिया गांधी यांना पॅलेस्टिनी मुसलमानांचे लोकांचे दुःख दिसते; मात्र हिंदूंचे दिसत नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !