वॉशिंग्टन – पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अमेरिकेत प्रचंड विरोध होत आहे. मुनीर यांच्या विरोधात वॉशिंग्टनच्या रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. वॉशिंग्टनमधील संतप्त पाकिस्तानी लोकांनी त्यांना उघडपणे ‘इस्लामाबादचा मारेकरी’, तसेच ‘पाकिस्तानचा मारेकरी’, असे संबोधले आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पाकिस्तानी निदर्शकांनी ‘आम्हाला लोकशाही हवी, हुकूमशाही नको’, अशी घोषणाही दिली.



असीम मुनीर यांच्यावर मजी पंतप्रधान इम्रान खान यांना कारागृहात डांबून ठेवल्याचा आरोप आहे. इम्रान खान याचे समर्थक असलेल्या शेकडो तरुणांनाही कारागृहात डांबण्यात आले आहे. मानवाधिकार संघटनांचा दावा आहे की, वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत राजकीय मतभेदांच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये ३ सहस्रांहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !