|
पणजी, १४ जून (वार्ता.) – गोव्यात जन्मलेल्या; मात्र पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेल्या ज्युड मेंडिस (वय ३८ वर्षे) या ख्रिस्ती धर्मीय व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्यास केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणार्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने याचिकादार मेंडिस यांना या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आहे.
ज्युड मेंडिस याचा जन्म वर्ष १९८७ मध्ये गोव्यात झाला आणि नंतर तो पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाला. कराची येथे शिक्षण घेतल्यानंतर तो वर्ष २०१६ मध्ये भारतात आला आणि त्याला त्या वेळी दीर्घकालीन पारपत्र (व्हिसा) देण्यात आला आणि तो २० जून २०२५ पर्यंत वैध आहे. पहलगाम येथील आंतकवादी आक्रमणानंतर भारत सरकारने २५ एप्रिल या दिवशी सर्व पाकिस्तानी नागरिकांचे पारपत्र रहित केले होते; मात्र ज्युड मेंडिस यांचे पारपत्र अजूनही वैध आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत १ जानेवारी २०१४ च्या पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून हिंदु, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी या तेथील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत भारतात आश्रय घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता; मात्र त्यासाठी १ जानेवारी २०१४ पूर्वी भारतात प्रवेश केल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
सर्वाेच्च न्यायालयात ज्युड मेंडिस यांची बाजू मांडतांना अधिवक्ता राघव अवस्थी म्हणाले, ‘‘पाकिस्तान येथे ख्रिस्ती समुदायाचा गंभीर धार्मिक छळ होत आहे. ज्युड मेंडिस यांना त्यांच्या धर्मामुळे प्राणाची भीती आहे आणि त्यामुळे ते पाकिस्तानात जाऊन नव्याने पारपत्र करू शकत नाहीत. याखेरीज त्यांनी वर्ष २०२० मध्ये भारतात आधारकार्ड घेतले आहे. फेब्रुवारी मासात एका भारतीय महिलेशी त्यांनी विवाह केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत