अपघातात वाचलेल्या एकमेव व्यक्तीची पंतप्रधान मोदी यांच्याकडून विचारपूस

कर्णावती (गुजरात) : येथील विमान अपघातात विमानातील २४१ जण आणि अन्य ५६, अशा एकूण २९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या विमानातील २४२ पैकी केवळ एक व्यक्ती जिवंत राहिली असून तिच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत. विश्वास कुमार रमेश असे या व्यक्तीचे नाव असून ती भारतीय वंशाची ब्रिटीश नागरिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात घायाळ झालेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, तेव्हा रमेश यांचीही भेट घेतली.
Visited the crash site in Ahmedabad today. The scene of devastation is saddening. Met officials and teams working tirelessly in the aftermath. Our thoughts remain with those who lost their loved ones in this unimaginable tragedy. pic.twitter.com/R7PPGGo6Lj
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
मला विश्वासच बसत नाही की, मी जिवंत कसा बाहेर आलो ?

रमेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ते विमानाच्या सीट क्रमांक ‘११ अ’वर बसले होते. विमान इमारतीवर कोसळल्यानंतर त्यांच्या सीटजवळ असणारा आपत्कालीन दरवाजा तुटला आणि तेथून बाहेर जाण्यासाठी जागा दिसली. मी सीटबेल्ट काढला आणि येथून बाहेर आलो आणि पळालो. माझ्या पायाला आणि हाताला लागले. विमानाने उड्डाण केल्यावर काही क्षणातच ते वर न जाता खाली येत असल्याचे लक्षात आले आणि नंतर ते धडकले. ही घटना काही सेकंदात घडली. मला विश्वासच बसत नाही की, मी जिवंत कसा बाहेर आलो ? काही क्षण मला वाटले की, मी मरणार आहे. जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा मला वाटले की, मी जिवंत आहे. मला वाटले की, मी इथून बाहेर पडू शकेन आणि मी बाहेर पडलो. विमानाच्या ज्या भागात माझे आसन होते, तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, बरेच लोक तेथेच अडकले होते. माझ्या दुसर्या बाजूला एक भिंत होती, कदाचित् तेथून कुणीही बाहेर पडू शकत नव्हते. २ हवाई सुंदरी, एक वयस्कर दांपत्य यांच्यासह सर्वकाही माझ्यासमोर जळत होते.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !