The Bengal Files Teaser : काश्मीरने आपल्याला रडवले, आता बंगाल आपल्याला घाबरवेल !

दिग्दर्शक विवेक अग्निनहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाच्या ‘टीझर’मधील वाक्य !

(टीझर म्हणजे चित्रपटाचा संक्षिप्त भाग)

दिग्दर्शक विवेक अग्निनहोत्री

मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपटाची प्रदर्शित केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ‘टीझर’ नुकताच प्रदर्शित झाला असून तो पाहून लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

१. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

२. या ‘टीझर’समवेत लिहिले आहे, ‘‘काश्मीरने आपल्याला रडवले, आता बंगाल आपल्याला घाबरवेल.’’

३. १ मिनिट २६ सेकंदांचा हा ‘टीझर’ पुढील संवादाने चालू होतो, ‘‘मी एक काश्मिरी पंडित आहे…म्हणूनच मी निश्चित म्हणू शकतो की, बंगाल आणखी एक काश्मीर बनत आहे.’’

४. तेज नारायण अग्रवाल आणि आय.एम्. बुद्धा प्रॉडक्शन प्रस्तुत हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स ट्रायलॉजी’चा एक भाग आहे, ज्यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताश्कंद फाइल्स’ यांचा समावेश आहे.

५. ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंवरील अत्याचारांविषयी काश्मीरनंतर आता बंगालमधील परिस्थितीवर चित्रपट काढावा लागतो, यावरून हिंदूबहुल देशात हिंदूंची काय स्थिती आहे ?, हे लक्षात येते ! याविषयी हिंदूंनी आता तरी काही केले नाही, तर उद्या प्रत्येक राज्याच्या संदर्भात असा चित्रपट काढावा लागेल !