पाद्रयांना ‘अल्लाहू अकबर’च्या (अल्ला महान आहे, याच्या) घोषणा देण्यास भाग पाडले !

सिमडेगा (झारखंड) : सिमडेगा जिल्ह्यातील समसेरा येथील चर्चमध्ये दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. येथे सशस्त्र मुसलमान दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ८ लाख रुपये लुटले. चर्चचे पाद्री इग्नेशियस टोप्पो आणि इतर पाद्रयांनाही लाठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांनी पाद्रयाच्या घरात घुसून चोरी केल्यानंतर प्राणघातक आक्रमण केले. ‘चर्चमध्ये दरोडा पडण्याची ही तिसरी वेळ आहे’, असे पाद्रयाने सांगितले. (यातून झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच उघड होते ! झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारला याचा जाब विचारला पाहिजे ! – संपादक) या वेळी सर्वांना ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणण्यास भाग पाडण्यात आले. पाद्री इग्नेशियस आणि इतर घायाळ यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दरोड्याच्या या घटनेनंतर स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला. थेथैटांगरजवळील बोलबा वळणावर रस्ता रोखण्यात आला. संतप्त लोकांनी घोषणाबाजी केली आणि गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाया घटनेचा विरोध निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी करतील का ? |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !