पोलिसांकडून कारवाई करण्याऐवजी केरेहळ्ळी यांना घटनास्थळावरून पकडून नेले !

बेंगळुरू (कर्नाटक ) – येथील मुसलमानबहुल अहमद नगरमधील मशिदीच्या मागील भागात गोरक्षक पुनीत केरेहळ्ळी आणि त्यांचे सहकारी यांनी तेथे बांधलेल्या गायींबद्दल मुसलमानांना प्रश्न विचारले. हे त्यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे प्रसारित केले. त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये ३० पेक्षा अधिक गायी दिसत होत्या. या लाईव्हद्वारे पोलिसांना दाखवताच अनेकांनी त्याच वेळी गायींना दुसरीकडे हलवले. ‘आता पोलीस येतील, तुमच्याकडे गायींच्या मालकीविषयीची काही कागदपत्रे असल्यास त्यांना दाखवा’, असे केरेहळ्ळी तेथे जमलेल्या मुसलमानांना सांगितले. थोड्याच वेळात पोलीस तेथे पोचले; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट केरेहळ्ळी यांनाच कह्यात घेतले आणि घेऊन गेले.
कुठे आहे कायदा ? कुठे आहे लोकशाही ?’ – केरेहळ्ळी यांचे प्रश्न
फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण चालू असतांना लिहिलेल्या पोस्टमध्ये केरेहळ्ळी म्हणाले की, हा मुसलमानांचा भाग आहे. येथे पुनीत केरेहळ्ळी येऊ शकत नाही, असे समजू नका ! पुढील काळात मी अजून मोठ्या प्रमाणात येईन. हिंदूंनो, हे लाईव्ह मोठ्या संख्येने प्रसारित करा आणि संबंधित अधिकार्यांना तात्काळ घटनास्थळी येण्यास सांगा. गोरक्षणात तुमचा खारीचा वाटा उचला. बेंगळुरूच्या अहमद नगरमधील मशिदीच्या मागील भागात बकरीद सणासाठी २५ पेक्षा अधिक गायी बळी देण्यासाठी बांधल्याची माहिती मिळताच गो संरक्षण करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या पुनीत केरेहळ्ळी यांनाच पोलिसांनी अटक केली ? कुठे आहे कायदा ? कुठे आहे लोकशाही ?’, असे प्रश्न केरेहळ्ळी विचारत होते.
या प्रसंगातील कांही दृश्ये पहा –
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात गोहत्येला कशी मोकळीक दिली जाते आणि गोरक्षकांवर कारवाई केली जाते, याचे हे जिवंत उदाहरण होय ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या कर्नाटकातील हिंदूंना आतातरी स्वतःची लाज वाटते का ? |







Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार