बेंगळुरू येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जूनच्या सायंकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनी कब्बन पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. तक्रारीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि कर्नाटक क्रिकेट बोर्ड यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. कब्बन पोलीस ठाण्यात ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’चे व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि विजयोत्सवाचे नियोजन करणारे आस्थापन यांच्या विरोधात निष्काळजीपणा अन् सदोष मनुष्यवध असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इंडियन प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी झालेल्या ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’ संघाचा सत्कार या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्टेडियमची मर्यादा केवळ ३२ सहस्र लोकांची असतांना स्टेडियम बाहेर ३ लाखांहून अधिक लोक गोळा झाले होते. त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करायचा होता. त्या वेळी प्रवेशद्वारावर ही चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण घायाळ झाले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयानेही स्वतःहून या घटनेची नोंद घेत यावर सुनावणी केली.
अपघाताची दंडाधिकार्यांकडून चौकशी करण्यात येणार !
कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर या घटनेविषयी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची दंडाधिकार्यांकडून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीचा अहवाल आल्यावर जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’ किंवा ‘कर्नाटक क्रिकेट असोसिएशन’ यांना हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सांगितले नव्हते. त्यांनी स्वतः हा कार्यक्रम आयोजित केला आणि संघाला कर्णावती येथून बेंगळुरूत आणले.
(म्हणे) ‘देशात यापूर्वी अनेक मोठे अपघात, उदा. महाकुंभमेळ्यात अपघात झाले आहेत !’ – मुख्यमंत्री सिद्धरामय्या४ जूनला संध्याकाळी घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, उत्सवासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक लोक जमले होते. सरकारने मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपयांची भरपाई घोषित केली आहे. घायाळांना सरकार विनामूल्य उपचार देईल. सर्व घायाळ धोक्याबाहेर आहेत. मी या घटनेचा बचाव करत नाही; पण देशात यापूर्वीही अनेक मोठे अपघात झाले आहेत, जसे की महाकुंभमेळ्यात ५० ते ६० जणांना प्राण गमवावे लागले. तथापि, याचा अर्थ असा नाही की, आम्ही दायित्व टाळत आहोत. भाजप राजकारण करत आहे, मला राजकारण करायचे नाही. स्टेडियममध्ये एक लहान प्रवेशद्वार आहे. तेथे मोठ्या संख्येने लोक जमले होते; त्यांनी ते प्रवेशद्वार तोडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक सरकारचे दायित्व सुरक्षा पुरवण्याचे होते, बाकीचे क्रिकेट असोसिएशनने हाताळायचे होते. (या अपघातासाठी राज्य सरकार, पोलीस, कर्नाटक क्रिकेट मंडळ उत्तरदायी आहे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवून संबंधितांना कारागृहात डांबण्याचीच आवश्यकता आहे. स्वतः सरकार कारवाई करणार नसल्याने केंद्र सरकार किंवा न्यायालय यांनाच याची नोंद घेऊन कृती करावी लागेल ! – संपादक) |
जर सरकारने योग्य सिद्धता केली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती ! – भाजप
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी या घटनेवरून काँग्रेस सरकारवर टीका करत सरकारला त्यागपत्र देण्यास सांगितले. ते म्हणाले की, जर सरकारने योग्य सिद्धता केली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती. कर्णावती येथे अंतिम सामन्याच्या वेळी दीड लाख लोक जमले होते; परंतु कोणताही अपघात झाला नाही. बेंगळुरूमध्ये इतक्या लवकर कार्यक्रम का आयोजित करण्यात आला आणि पूर्ण सिद्धतेविना त्याला अनुमती का देण्यात आली ? विधानसभेसमोर उत्सव साजरा करण्याची काय आवश्यकता होती आणि हा कार्यक्रम मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी आयोजित केला होता का ?, यांची उत्तरे त्यांना द्यावी लागतील.
|
‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’ संघाने हानीभरपाई द्यावी ! – काँग्रेस
काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, ही एक अतिशय दुःखद आणि वेदनादायक दुर्घटना आहे. मी मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि घायाळांसाठी प्रार्थना करतो. या दुर्घटनेसाठी कर्नाटक सरकार पीडितांना भरपाई देईल; परंतु हा कार्यक्रम कर्नाटक क्रिकेट बोर्डाच्या अंतर्गत येतो. ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’ संघामध्ये एका परदेशी आस्थापनाचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी या स्पर्धेतून ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. जर त्यांनी ११ मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २२ कोटी रुपये आणि घायाळांना २५ ते ५० लाख रुपये दिले, तर ते योग्य ठरेल. जे अपंग झाले आहेत, त्यांना अधिक पैसे मिळाले पाहिजे. भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये; म्हणून या प्रकरणाची योग्य चौकशी करावी.
संपादकीय भूमिकातक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याचे धाडस पोलीस करणार नाहीत, हे लक्षात घ्या ! राज्यातील जनता सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे का ? |
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या