अमेरिकेत ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या उद्भवण्याची भीती
(‘ब्रेन ड्रेन’ म्हणजे एखाद्या देशातील कुशल आणि उच्चशिक्षित लोक पैसा आणि उच्चभ्रू जीवन जगण्यासाठी अन्य देशात जाणे)

वॉशिंग्टन – गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका जागतिक वैज्ञानिक प्रतिभेचे आश्रयस्थान मानले जात आहे; पण आता तो देश त्याची चमक गमावत आहे. ८० वर्षांत प्रथमच हा देश ‘ब्रेन ड्रेन’चा सामना करत आहे. ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ने केलेल्या अलीकडच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ७५ टक्के शास्त्रज्ञ अमेरिका सोडून जात आहेत किंवा ते युरोप आणि आशिया या खंडांमध्ये नवीन स्थळे शोधण्यासाठी आधीच स्थलांतरित झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची संशोधन निधीत कपात करणे, स्थलांतरित विद्यार्थ्यांवरील बंदी आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावरील आक्रमण यांसारखी कठोर धोरणे ही या ‘ब्रेन ड्रेन’मागील प्रमुख कारणे आहेत.
१. ट्रम्प यांच्या संशोधन निधीत कपात करण्याच्या निर्णयाविरुद्ध अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये निदर्शनेही झाली आहेत. निधी कपातीमुळे संशोधनाचा कणा मोडला गेला आहे.
२. ट्रम्प प्रशासनाने वर्ष २०२६ साठी राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या अनुदानात ४० टक्के कपात केली आहे. यासह ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’कडून १३ सहस्र कोटी रुपयांचे अनुदान रहित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. निधी अल्प झाल्यामुळे प्रकल्प बंद होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
३. जगभरातील देश आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ (कृत्रिम बुद्धीमत्ता), हवामान विज्ञान आणि अनुवंशशास्त्र यांसारख्या क्षेत्रांत काम करणार्या शास्त्रज्ञांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रस्ताव दिले जात आहेत. यामुळे जागतिक स्तरावर एक नवीन स्पर्धा निर्माण झाली आहे.
४. युरोपियन युनियनने शास्त्रज्ञांना युरोपमध्ये आकर्षित करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे विविध कार्यक्रम घोषित केले आहेत.
५. फ्रान्सच्या मार्सेल विद्यापिठाने शास्त्रज्ञांना आश्रय देण्यासाठी ‘सेफ प्लेस फॉर सायन्स’ नावाचा कार्यक्रम चालू केला आहे. जर्मनीने शास्त्रज्ञांना आकर्षित करण्यासाठी योजना आखल्या आहेत. सिंगापूरच्या ‘नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने अमेरिकी संशोधकांसमोर तेथे काम करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !