
अमृतसर (पंजाब) – भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत असतांना त्याविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला पुरवल्याच्या प्रकरणी राज्यातील तरन तरण जिल्ह्यातून गगनदीप सिंह याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील भ्रमणभाषही कह्यात घेतला असून, त्याद्वारे ही माहिती पाठवली जात असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
१. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतीय सैन्य ज्या ठिकाणी तैनात होते, तेथील माहिती गगनदीप याने पाकिस्तानी यंत्रणेला पुरवली होती.
२. मागील ५ वर्षांपासून गगनदीप सिंह हा खलिस्तानी आतंकवादी गोपाल सिंह चावला याच्या संपर्कात होता. त्याच्याच माध्यमातून गगनदीप सिंग हा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संपर्कात आला.
३. गगनदीप याच्या भ्रमणभाषमध्ये पाकिस्तानला पुरवण्यात आलेली माहिती सापडली असून त्याचसमवेत पाकिस्तानी गुप्तरचर संघटना ‘इंटर इंटेलिजन्स सर्व्हिस’ अर्थात् आय.एस्.आय.शी निगडित किमान २० व्यक्तींचे भ्रमणभाष क्रमांकही सापडले आहेत.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !