|

मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यात चालू असलेल्या हत्यासत्रांवरून येथील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना फैलावर घेतले जात आहे. रा.स्व. संघाचे नेते कल्लड्क प्रभाकर भट यांच्यासह १५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस अधीक्षक अरुण यांनी मध्यरात्रीच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या घरी गेले. त्यांना गुन्हेगारांसारखे वागवले. पोलिसांच्या या अन्याय्य कारवाईच्या विरोधात पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेल्या हिंदूंविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला. कोणतीही पूर्व अनुमती न घेता अवैधपणे जमाव जमवून पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. (मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावरून जेव्हा त्यांचा जमाव पोलीस ठाण्याला घेराव घालतो, तेव्हा हेच पोलीस शेपूट घालून बसतात. कर्नाटक पोलिसांचा हा हिंदुद्वेष लक्षात जाणा ! – संपादक)

१. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठ सुहास शेट्टी यांची हत्या झाली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना रा.स्व. संघाचे नेते कल्लड्क प्रभाकर भट यांनी कथित प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
२. शेट्टी यांच्या हत्येच्या बदल्यात अब्दुल रहिमान याची हत्या झाली, असा आरोप स्थानिक मुसलमान नेत्यांनी केला.
३. त्यानंतर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या घरी मध्यरात्री जाऊन त्यांची चौकशी केली. याला स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र विरोध केला.
४. यावरून पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. प्रमोद राय नंदुगुरी, तिलक नंदुगुरी, मोहन केरेकोडी, चंद्रशेखर नूजिबाळ्तिल, महेश कुट्रुप्पाडी, डीकेय्या नूजिबाळ्तिल, सुजित कुट्रुप्पाडी, शरथ नंदुगुरी, श्रेयथ नंदुगुरी, उमेश नूजिबाळ्तिल, राधाकृष्ण के., जयंत यांच्यासह इतर तिघांविरुद्ध दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कडब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अन्यायाविरुद्ध आंदोलन अपरिहार्य ! – विश्व हिंदु परिषदया संदर्भात विहिंपचे दक्षिण कन्नड जिल्हा सहकार्यवाह प्रमोद राय यांनी म्हटले की, पोलीस रात्री अचानक हिंदुत्वनिष्ठांच्या घरी येत आहेत. त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात आम्हाला आंदोलन करणे अपरिहार्य आहे. |
संपादकीय भूमिका
|
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती