पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर जे त्यांच्या धर्मांधतेमुळे ‘मुल्ला-मुनीर’ या नावाने ओळखला जातो, त्याच्या सैन्याला आणि आतंकवादी पिलावळीला निष्पाप भारतियांच्या हत्येला उत्तरदायी धरून त्यांच्यावर कठोर कारवाईची वेळ आता आली आहे. आता होणारे युद्ध हे पारंपरिक नसणार. भारताने स्वतःच्या सैनिकी शक्तीचा एकाच वेळी बहुक्षेत्रीय आघाडीवर वापर केला आहे. भारतीय सैन्य उष्कृष्ट काम करत आहे, ज्याला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
१. आतंकवादाच्या उच्चाटनात ‘ऑपरेशन सिंदूर’ हा प्रारंभ ठरावा !

७ मे २०२५ या दिवशी भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ आतंकवादी प्रशिक्षण छावण्यांवर क्षेपणास्त्राने आक्रमणे केली. यामुळे २२ एप्रिलला आतंकवादी आक्रमणात हत्या झालेल्या हिंदु महिला आश्वस्त झाल्या की, त्यांच्या पतीच्या हत्या झाल्याचा सूड पाकिस्तानी आतंकवाद्यांवरील कारवाईने घेतला जाईल. भारतवासियांसाठी ही आक्रमणे आतंकवाद्यांविरुद्धच्या लढाईचा आरंभ आहे. प्रत्येक राष्ट्रवादी भारतियाच्या पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहेत. आतंकवाद्यांना ठेचायचे कार्य त्यांनी चालूच ठेवावे. आतंकवादी आक्रमणांना पाठिंबा देणारे, साहाय्य करणारे आणि योजना आखणारे पाकिस्तानमध्ये किंवा जगात कुठेही लपले असतील, त्यांना ओळखून, लक्ष्य करून कायमचे नष्ट करण्याची आवश्यकता आहे.
२. पाकिस्तानच्या उद्दामपणाकडे पाश्चात्त्य देशांचा कानाडोळा
मुल्लांच्या आणि स्थानिक जनतेच्या साहाय्याने पाकिस्तानी लष्कराने वर्ष १९४७ पासून उपखंडात हाहाःकार माजवला आहे. बलात्कार, जाळपोळ, लुटालूट आणि निरपराध्यांची हत्या हे पाकिस्तानी लष्कराचे मानक बनले आहे. यासाठी पाकिस्तान, त्याचे जनरल आणि त्यांचे सैनिक यांना कधीच उत्तरदायी धरले गेले नाही. उलटपक्षी जनरलच्या कपटी वागणुकीला अमेरिका आणि ब्रिटनसहित पश्चिमी देशांनी सातत्याने पाठीशी घातले आहे. मुसलमान राष्ट्रांनीही पाकिस्तानी सैन्याला कधीच उलट प्रश्न केला नाही.
३. पाकच्या संदर्भात केलेल्या सरकारी चुका
३ अ. नेहरू सरकारने केली हिंदूंच्या हत्यार्यांची पाठराखण : वर्ष १९४७ मध्ये सिंध आणि बलुचिस्तान येथील २० सहस्र हिंदूंच्या नरसंहाराच्या विरोधात नेहरूंच्या नेतृत्वातील भारत सरकारने साधी प्रतिक्रियाही दिली नाही. १० सहस्रांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांच्या कत्तली करणारा झिया उल हक याला अरब राष्ट्रांनी ‘जनरल’ पदवी दिली आणि पुढे जाऊन ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले.

३ आ. पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना विनामोबदला सोडून देणे ही ऐतिहासिक चूक ! : तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदु स्त्रियांवर बलात्कार आणि प्रचंड नरसंहार झाला. जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या साहाय्याने लेफ्टनंट जनरल टिक्का खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराने हे सर्व केले. कालांतराने भारताविरुद्ध सहस्र वर्षांचे युद्ध आणि जिहाद यांची शपथ घेणार्या झुल्फिकार अली भुत्तो यांनी टिक्का खान यांना ‘जनरल’ पदावर बढती दिली.
वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ च्या युद्धांमध्ये युद्धबंदीवान झालेल्या अनेक भारतीय सैनिकांना दशके उलटून गेली, तरी पाकिस्तानी कारागृहात सडवले जात आहे; मात्र वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर भारताने अट न घालता ९० सहस्र पाकिस्तानी युद्धबंदीवानांना मुक्त केले आणि भारताच्या युद्धबंदी केलेल्या सैनिकांना सोडवण्याची सुवर्णसंधी सोडणे, ही ऐतिहासिक चूक केली.

३ इ. इंदिरा गांधींचा सिमला करार : बांगलादेशी हिंदूंच्या नरसंहारात सहभागी झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या सहस्रो सैनिकांवर आजपर्यंत कोणताही खटला चालवलेला गेला नाही. बांगलादेशने स्वतंत्र झाल्यानंतर भारताकडे विनंती केली होती की, गुन्हेगार पाकिस्तानी सैनिकी अधिकार्यांना त्यांच्या हवाली करावे; पण इंदिरा गांधींनी ‘सिमला करार’ केला. ज्यायोगे सर्व पाकिस्तानी युद्धबंदीवानांना परत पाकिस्तानात पाठवण्यात आले. तिथे त्यांचे नायकासारखे स्वागत झाले आणि त्यांना बढत्या मिळाल्या. मानवतेच्या विरोधात अत्यंत घृणास्पद गुन्हे करणार्या पाकिस्तानी लष्करी अधिकार्यांना शिक्षा देण्यात तत्कालीन भारतीय सरकार अपयशी ठरले.
४. पाकिस्तानी आतंकवाद्यांचा खेळ थांबवायलाच हवा !

४ अ. भारतीय संसदेवर आक्रमण : वर्ष २००१ मध्ये भारतीय संसदेवर जैश-ए-महंमदच्या ५ आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या सर्वांना पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’ने प्रशिक्षण दिले होते आणि भारतीय संसदेवर आक्रमणासाठी मार्गदर्शन केले होते. तत्कालीन वाजपेयी सरकारकडून पाकिस्तानविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

४ आ. मुंबईवरील आक्रमण : ‘आय.एस्.आय.’कडून प्रशिक्षित झालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या १० आतंकवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत ४ दिवस धुमाकूळ घातला आणि संपूर्ण जग हे नाट्य पहात राहिले. पाकिस्तानी लोक त्यावर आनंद व्यक्त करत होते. त्या वेळीसुद्धा पाकविरोधात कारवाई झाली नाही. त्याहूनही वाईट म्हणजे आतंकवादी आक्रमणाला ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्याचा प्रयत्न मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सोनिया गांधींच्या काँग्रेस सरकारने केला. पाकिस्तानी सैन्य आणि त्याच्या आतंकवादी संघटनांनी आखलेल्या अन् कार्यवाहीत आणलेल्या डझनावरील हत्याकांडांपैकी ही केवळ काही प्रतिनिधिक उदाहरणे आहेत.
५. लाजिरवाणे वास्तव

जगातील एकमेव हिंदूबहुल देश असलेल्या भारताच्या सर्व सरकारांनी मागील ७ दशकांत ‘भारताचा नाश करण्यासाठी उघडपणे जिहाद’ राबवणार्या पाकिस्तानी लष्कराविरुद्ध कोणतीही ठोस आणि परिणामकारक कारवाई केलेली नाही.’ उलट पाकिस्तानी नेते, सैन्यप्रमुख, लेखक, कलाकार आणि त्यांचे भारतातील समर्थक यांचे उदात्तीकरण करण्यात आले.
६. अफगाण आणि बलुच यांच्याकडून पाकचा प्रतिकार !
पाकिस्तानने पख्तूनख्वा (पठाण) आणि बलुच लोकांना भारत अन् बांगलादेश यांच्याप्रमाणेच भीती निर्माण करून, निर्दयतेने हत्या करून आणि त्यांच्या नैसर्गिक संपत्तीची लूटमार करून दडपण्याचा प्रयत्न केला. आज पख्तून ‘तहरिक-ए-तालिबान’ अंतर्गत आणि बलुच ‘बलुच लिबरेशन आर्मी’ अंतर्गत संघर्ष करत आहेत. या अफगाण आणि बलुच राष्ट्रभक्तांकडे ना तोफा आहेत, ना बंदुका, ना हवाई दल तरीही ते प्रशिक्षित अन् सुसज्ज पाकिस्तानी सैन्य, तसेच सत्ताशक्ती यांना खंबीरपणे तोंड देत आहेत.
७. जगभरातील पाकिस्तानचे पाठीराखे !
वर्ष १९४७ पासून पाकिस्तानला अमेरिका, ब्रिटन, नाटो, चीन आणि इतर इस्लामी देशांकडून समर्थन मिळत आले आहे. भारताविरुद्ध भ्याड आक्रमणे करणे, ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. ‘पहिले आक्रमण करा, पुढे ५-६ दिवस युद्ध करा, भारताला जितका त्रास देता येईल, तितका द्या आणि त्याच वेळी स्वतःला बळी म्हणून सादर करा. प्रचारयुद्धात पाकिस्तान भारतापेक्षा वरचढ राहिला आहे आणि पाश्चिमात्य देशांसह, तसेच इस्लामी राष्ट्रांसमवेतची भागीदारी इतकी मजबूत आहे की, काही घंट्यांतच या देशांचे नेते भारतावर निर्बंध घालतात, मध्यस्थीची सिद्धता दर्शवतात आणि तात्काळ युद्धविरामाची मागणी करतात. भारताला प्रत्येक वेळी पाकिस्तानसमवेतच्या प्रत्येक संघर्षात वारंवार दबावाखाली आणले गेले आणि भारताला पाकिस्तानवर वर्ष १९७१ वगळता कधीच गंभीर प्रतिघात करू दिला नाही.
८. भारताची पाकवर नियंत्रित-मर्यादित प्रतिक्रिया का ?
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ आतंकवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र आक्रमणे केली. त्यानंतर असे वारंवार सांगण्यात आले की, भारताने पाकिस्तानी सैन्याची कोणतीही इमारत किंवा नागरी क्षेत्रे लक्ष्य केली गेली नाहीत. पाकिस्तानने मात्र ८ आणि ९ मेच्या रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान येथील १५ शहरांवर आक्रमणे केली. ज्यामध्ये जम्मू, अमृतसर, तरन तारण आणि जैसलमेर या शहरांचाही यात समावेश होता. या वेळी काही मृत्यूंचीही नोंद झाली आहे. भारत मात्र आंतरराष्ट्रीय दबावाखाली आला आहे.

भारत पाकिस्तानचे तुकडे करण्यासाठी आक्रमण करत नाही. अफगाण, खैबर पख्तूनख्वा आणि बलुच लोक जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्यांना आवश्यक ते करून पाकिस्तानच्या दडपशाही लष्करी वर्चस्वापासून स्वातंत्र्य प्राप्त करतील. भारताची सहानुभूती बलुच आणि पख्तून लोकांना आहे. भारत आवश्यक तेव्हा स्वातंत्र्यप्रेमी बलुच लोकांचा पाठिंबा देईल. मोदी सरकारची धोरणे आणि दीर्घकालीन नियोजनामुळे फ्रान्सकडून ‘राफेल’ लढाऊ विमान, रशियाकडून ‘एस्-४००’, भारताने बनवलेली ‘आकाश’, ‘पृथ्वी’ ही क्षेपणास्त्रे अन् ‘इस्रो’मध्ये केलेली गुंतवणूक याचे लाभ दिसत आहेत. भारत बहुक्षेत्रीय आघाडीवर युद्धसज्ज असेलच, ज्यात सायबरयुद्धही अंतर्भूत आहे.
प्रत्येक देशप्रेमी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आतंकवाद ठेचून काढण्याची अपेक्षा करत आहे. आतंकवादी आक्रमणांना पाठिंबा देणारे, साहाय्य करणारे आणि योजना आखणारे पाकिस्तानमध्ये किंवा जगात कुठेही लपले असतील, त्यांना ओळखून, लक्ष्य करून कायमचे नष्ट करावे, ही प्रत्येक देशप्रेमी भारतियाची सरकारकडून अपेक्षा आहे !
– कर्नल रामकृष्णन् सी.एन्. (निवृत्त), देहली.
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !