
मॉस्को (रशिया) – रशियाच्या दौर्यावर गेलेल्या भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे विमान मॉस्को विमानतळावर उतरण्यापूर्वीच युक्रेनने या विमानतळावर ड्रोन आक्रमण केले. यामुळे या भारतीय विमानाला विमानतळावर उतरवण्यास काही काळ थांबवण्यात आले. हे विमान काही मिनिटे हवेतच घिरट्या घालत राहिले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समोर येताच विमान उतरले. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये पाकचा सहभाग असल्याची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचे अनेक गट विदेशात गेले आहे. यांपैकी एक गट मॉस्को येथे पोचला होता.
भारतीय शिष्टमंडळ या दौर्यात रशियाचे सरकार, त्यांचे ज्येष्ठ खासदार, अधिकारी आणि तज्ञ यांना पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाविषयी आणि आतंकवाद्यांची माहिती देईल.
🚨 Ukraine's Drone Attack on Russia Delays Op Sindoor Delegation!
The flight carrying DMK’s Kanimozhi-led all-party team — delivering India’s anti-terror message to the world — faced a brief delay. ✈️
Russia claims it intercepted 112 Ukrainian drones in a massive overnight… pic.twitter.com/KmNhfeys8Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2025
पुतिन यांनी व्यक्त केली होती भीती !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. ‘जेव्हा अन्य देशांचे सरकारी शिष्टमंडळ रशियाच्या दौर्यावर असते, त्या वेळी युक्रेन मॉस्कोवर ड्रोन आक्रमण करतो’, असे पुतिन यांनी त्यांना सांगितले होते. पुतिन यांनी सांगितलेली माहिती खरी ठरल्याचे या घटनेतून दिसून आले. पुतिन यांच्या मते, युक्रेनने जाणीवपूर्वक हे आक्रमण केले आहे. जगाचा रशियाशी संपर्क होऊ नये, भीतीपोटी रशियात कुणी येऊ नये, हा त्यामागील हेतू आहे.
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?