मैसुरू वाडियार राजघराणे : दक्षिण भारताच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक !

मैसुरू वाडियार राजघराणे हे दक्षिण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचे राजघराणे मानले जाते. १४ व्या शतकापासून २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत कर्नाटकात या राजघराण्याचे दीर्घकाळ आधिपत्य होते. प्रारंभी विजयनगर साम्राज्याचे भागीदार असलेले हे राजे नंतर मुसलमान आक्रमणांपासून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. या राजघराण्याने कला, साहित्य, धर्म, राजकारण आणि व्यापार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आज या राजघराण्याची माहिती येथे देत आहोत.

दक्षिण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचे ‘मैसुरू वाडियार राजघराणे !’

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. मैसुरू वाडियार राजघराण्याचा इतिहास

मैसुरू वाडियार राजघराण्याची स्थापना १४ व्या शतकात झाली. इ.स. १३९९ मध्ये देवराज वाडियार यांनी कर्नाटकातील मैसुरू प्रदेशात विजयनगर साम्राज्याच्या साहाय्याने त्यांनी मैसुरू भागात स्वतःचे प्रभुत्व प्रस्थापित केले. त्या काळात हे राजघराणे विजयनगरच्या साम्राज्यात एक प्रमुख भागीदार होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार यांचे कुटुंबीय

१५ व्या शतकाच्या प्रारंभी विजापूरच्या आदिलशाही साम्राज्याच्या आक्रमणामुळे मैसुरू राजघराणे दुर्बल झाले. तरीही श्री. कृष्णराज वाडियार यांनी पुन्हा साम्राज्याची पुनर्स्थापना केली आणि मैसुरूला एक प्रभावी राजकीय शक्ती बनवले.

पूर्वजांनी वापरलेल्या शस्त्र प्रदर्शनाच्या समोर गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत श्री. चामराज वाडीयार

२. कृष्णराज वाडियार तृतीय : धार्मिक आणि सांस्कृतिक पुरस्कर्ते

श्री. कृष्णराज वाडियार तृतीय (वर्ष १७९४ ते १८६८) हे मैसुरूच्या इतिहासातील एक महान शासक होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जनतेच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यांनी कला, साहित्य, धर्म आणि शिक्षण यांच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. मैसुरूची शास्त्रीय संगीत परंपरा, चित्रकला आणि धार्मिक परंपरा कृष्णराज वाडियार यांच्या काळात विशेष प्रगती पावली.

इ.स. १८०० मध्ये त्यांनी एक सांस्कृतिक संस्था स्थापन करून संगीत, नृत्य आणि चित्रकला यांचे संवर्धन केले.

३. मैसुरू राजघराण्याचा दसरा उत्सव : शक्ती आणि वैभव यांचे प्रतीक

मैसुरू राजघराण्याचा दसरा उत्सव हा भारतातील एक अत्यंत भव्य आणि प्रभावशाली आहे. प्रतिवर्षी तो मैसुरूच्या राजमहालात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हा उत्सव राजघराण्याची गौरवशाली परंपरा, शक्ती आणि धार्मिकता यांचे प्रतीक मानला जातो.

४. मैसुरू राजवाडा म्हणजे राजसत्तेचे वैभव !

मैसुरूचा प्रसिद्ध राजवाडा ज्याला ‘अंबा विलास पॅलेस’ असेही म्हणतात. हा राजवाडा म्हणजे राजघराण्याचे सौंदर्यशास्त्र आणि स्थापत्यकला यांचा उत्कृष्ट नमुना आहे. १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात उभारलेला हा राजवाडा कालांतराने एक महत्त्वपूर्ण राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनला.

५. सत्ता आणि राजकीय इतिहास

मैसुरू राज्य विजापूर, हैद्राबाद (भाग्यनगर) आणि महाराष्ट्र या प्रदेशांमधील सत्ता संघर्षात अनेकदा अडकले. १८ व्या शतकानंतर हैदर अली आणि टीपू सुलतान यांच्या काळात मैसुरू राजघराण्याने अनेक युद्धे लढून स्वतःच्या प्रदेशाची स्थिती बळकट केली.

श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार यांचा सत्कार करतांना सनातन संस्थेचे श्री. वीरेंद्र मराठे (डावीकडे)

६. राजघराण्याचे कला, संस्कृती आणि धार्मिक क्षेत्रांतील योगदान

मैसुरू राजघराण्याने त्यांच्या सत्ताकाळात अनेक नामवंत कलाकार, लेखक, संगीततज्ञ आणि चित्रकार यांना आश्रय दिला. त्यांनी धर्म, साहित्य, शास्त्रीय संगीत आणि चित्रकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विकास कार्यक्रम चालू केले.

खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार यांच्याविषयी…

श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार

नोव्हेंबर १९९२ मध्ये जन्मलेले श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार हे सध्या या राजघराण्याचे महाराज असून ते आता परंपरा पुढे नेत आहेत. श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराजा वाडियार यांचे प्राथमिकपासून पदवीपर्यंतचे शिक्षण बेंगळुरूमध्ये झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्या सागरमध्ये, तर बेंगळुरूमधील विद्या निकेतन स्कूलमधून १० वीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी बेंगळुरूमधील कॅनेडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आयबी डिप्लोमा प्रोग्रॅम केला आणि १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ॲमहर्स्ट येथील मॅसॅच्युसेट्स विद्यापिठात प्रवेश घेतला आणि वर्ष २०१५ मध्ये पदवी प्राप्त केली. यदुवीर वाडियार यांनी अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयात कला शाखेची पदवी मिळवली. मैसुरूला भारतातील ‘सर्वांत स्वच्छ शहर’ म्हणून मान्यता मिळाली. या मान्यता मिळण्याच्या २ वर्षांच्या कालावधीत श्री. यदुवीर वाडियार यांनी मैसुरूमध्ये ‘स्वच्छ भारत मोहिमेचे राजदूत’ म्हणून कार्य केले आहे.

श्री. यदुवीर यांना वेद आणि कन्नड संगीत यांचे चांगले ज्ञान आहे, तर त्यांना घोडेस्वारी आणि ‘पोलो’ या खेळाचीही आवड आहे. सध्या ते भाजपचे खासदार आहेत.

खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार यांची धर्मविरोधकांना चेतावणी . . .

धर्माला कुणी विरोध केल्यास तो सहन करणार नाही !

सध्या हिंदुत्वाविषयी चुकीचा प्रचार वाढला आहे. हिंदुत्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आम्हाला विरोध झाला, तरी आम्ही सहन करू; पण आमच्या धर्माला कुणी विरोध केला, तर आम्ही ते सहन करणार नाही. शेतकर्‍यांची भूमी वक्फ बोर्ड घशात घालत आहे. त्याविरोधात आम्ही लढा देऊ.

२० व्या शतकात जयचामराजेंद्र वाडियार (वर्ष १९१९ ते १९७४) हे प्रभावी राजकारणी आणि समाजसेवक म्हणून ओळखले गेले. राज्यपाल पद भूषवल्यानंतर त्यांनी मैसुरूच्या सांस्कृतिक परंपरेचे संरक्षण केले आणि नवचैतन्य दिले. मैसुरू राजघराण्याने दक्षिण भारताच्या राजकीय, धार्मिक, कला, साहित्य आणि सांस्कृतिक या क्षेत्रांत मोलाची भूमिका निभावली आहे. या परंपरेचा प्रभाव आजच्या पिढीला सांस्कृतिक मूल्ये, ऐतिहासिक वारसा आणि राजकीय दायित्व कसे निभावायचे, याविषयीची शिकवण देतो.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷