कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या प्रयत्नांतून मुलांमध्ये नैतिक मूल्ये अन् राष्ट्रप्रेम विकसित होते !

संस्कारशील होण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !
• स्वभाषेचा अभिमान बाळगा !
• हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करा !
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना भेटी द्या !
• परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा, तसेच स्वदेशी खेळ खेळा !
विद्यार्थ्यांनी करावयाचे आदर्श संकल्प !
• मी सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि परिश्रम यांचा स्वीकार करीन.
• आई-वडील, गुरुजन आणि वडीलधारे यांचा आदर करीन.
• राष्ट्रप्रेम, सेवाभाव यांसह चांगल्या वाचनाची सवय जोपासीन.
• स्वतःला सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि आदर्श नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करीन.
मुलांनो, याची उत्तरे स्वतः शोधा !

• माझ्यातील सर्वांत चांगला गुण कोणता आहे ?
• माझ्यातील कोणता दोष मला घालवायचा आहे ?
• मी कोणत्या महापुरुषाला आदर्श मानतो ? आणि का ?
• माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे ?
• माझ्या कृतींमुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांना काय लाभ होणार आहे ?
• मी स्वतःमध्ये कोणता सकारात्मक पालट करणार आहे ?
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
आधी मन शुद्ध करावे !