बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्री. संदीप बालकृष्ण हे भारतीय इतिहास, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रांतील एक प्रसिद्ध विद्वान आहेत. ते इंग्रजी आणि कन्नड माध्यमातून हिंदु संस्कृतीच्या सखोल अभ्यासाला सामाजिक माध्यमे अन् लेखन स्वरूपात विस्तारत आहेत. त्यांचे लेखन तत्त्वज्ञान, राजकारण, संस्कृती आणि इतिहास यांमधील विश्लेषणात्मक दृष्टी कशी असायला हवी, याविषयी दिशादर्शन करणारे आहे.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. श्री. संदीप बालकृष्ण यांचा परिचय आणि प्रबुद्ध लेखक म्हणून प्रवास
अ. श्री. संदीप बालकृष्ण हे ‘द धर्मा डिस्पॅच’ नावाच्या ‘ऑनलाईन जर्नल’चे (वार्तापत्राचे) संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. हे वार्तापत्र हिंदु संस्कृती, तात्त्विक विचार, धार्मिक परंपरा आणि इतिहास यांवरील सखोल लेखांसाठीचे समर्पित आहे.
आ. श्री. संदीप बालकृष्ण हे ‘प्रेक्षा जर्नल’चे सहसंपादक असून या संकेतस्थळावर त्यांचे इतिहास, साहित्य आणि संस्कृती यांवरील लेख नियमितपणे प्रकाशित होतात.
श्री. संदीप बालकृष्ण यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांनी ‘ओपन मॅगझिन’ आणि ‘इंडिया फॅक्ट्स’ यांसारख्या देशातील प्रमुख इंग्रजी माध्यमांचे लक्ष वेधले आहे. एक ‘प्रबुद्ध लेखक’ म्हणून ते श्रोतृवर्ग आणि वाचकवर्गाला हिंदु दर्शन अन् इतिहास यांच्या ज्ञानाने प्रेरित करत आहेत.

२. श्री. संदीप बालकृष्ण यांनी लेखन केलेले प्रमुख साहित्य
श्री. संदीप बालकृष्ण यांनी अनेकविध प्रकारचे लिखाण केले आहे. त्यांनी लेखन केलेले साहित्य आधुनिक दृष्टीकोनातून इतिहासाचे विश्लेषणासाठी विशेषकरून ओळखले जाते. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये,
अ. ‘Tipu Sultan: The Tyrant of Mysore’: टिपू सुलतानच्या वास्तविक चरित्राचे समीक्षात्मक विश्लेषण करणारे पुस्तक.
आ. ‘Invaders and Infidels : From Sindh to Delhi’ : आक्रमणकर्ते आणि धर्मद्रोह्यांचा इतिहास.
इ. ‘The Madurai Sultanate : A Concise History’ : तमिळनाडूच्या इतिहासातील दुर्लक्षित मदुराई सुल्तनतचा उल्लेख.
ई. ‘Seventy Years of Secularism’ : भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचे समीक्षात्मक चित्रण.
उ. ‘10 Lessons from Hindu History in 10 Episodes’ : हिंदु इतिहासाच्या १० अध्यायांमधील १० धडे.
ऊ. ‘Stories From Inscriptions’ : शिलालेखांमधील जिवंत असलेल्या कथा.
या व्यतिरिक्त त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांची प्रसिद्ध कन्नड कादंबरी ‘आवरण’चे इंग्रजीमध्ये ‘Aavarana : The Veil’ या नावाने भाषांतर मोठे साहित्यिक योगदान दिले आहे.

३. सन्मान आणि पुरस्कार
श्री. संदीप बालकृष्ण यांना ‘भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषदे’ची ‘फेलोशिप’ मिळाली आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि इतिहास यांच्या संवर्धन क्षेत्रातील हे प्रतिष्ठित पद असून यामुळे श्री. संदीप यांनी दिलेले योगदान गौरवास्पद आहे.
४. माध्यमांमधील योगदान
श्री. संदीप बालकृष्ण यांचे लेख देशभरातील विविध माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लेखन केलेले लेख हे सामाजिक तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांवरील मतप्रदर्शनास साहाय्यभूत ठरतात. त्यांच्याकडे प्रचलित समस्यांना पौराणिक दृष्टीकोनातून उत्तरे देण्याची विशिष्ट शैली आहे. ज्यामुळे अनेक धर्मप्रेमी आणि सर्वसामान्य हिंदु वाचक यांना नवी दृष्टी मिळते.
५. भारतीय परंपरेची ओळख करून देणारे श्री. संदीप बालकृष्ण !
श्री. संदीप बालकृष्ण यांच्याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास ते अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचे तज्ञ आहेत. आजच्या पिढीला भारतीय परंपरेच्या खर्या तत्त्वांची ओळख करून देण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या लेखनांचा प्रभाव देश-विदेशातील वाचकांना योग्य विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?