
नागपूर – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००९ चे आक्रमण झाले, तेव्हाच आतंकवाद आणि आतंकवाद्यांना पोसणारे ‘आका’ अर्थात् तेथील (पाकिस्तानचे) सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आम्ही जगापुढे केली होती; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून घोषित केली आहे. भारताची परराष्ट्र आणि संरक्षण विषयक भूमिका आता अधिक ठाम, निर्णायक अन् जागतिक स्तरावर प्रभावी झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. भारतीय सैन्याच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे या दिवशी देशाला संबोधित केले होते. या भाषणावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1922306874550166002
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक वेळी आक्रमण झाले की, पाकिस्तानचे सरकार ‘आमचा आतंकवादाशी काही संबंध नाही’, असे जगासमोर कांगावा करत होते; पण आता तसे होणार नाही. भारताने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे जगापुढे मांडली आहे. ही भूमिका केवळ भारताच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर जागतिक आतंकवादविरोधी लढ्यासाठीही एक निर्णायक टप्पा आहे. पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक आक्रमणानंतर स्वतःचे दायित्व झटकण्याचा प्रयत्न केला; पण आता भारत अशा भ्रामक दाव्यांना भुलणार नाही. भारताच्या सामरिक क्षमतेचा आणि जागतिक दबाव निर्माण करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला आहे. भारतीय सैन्यदलाचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मोदी यांनाही धन्यवाद देतो. ‘आता केवळ पाकव्याप्त काश्मीवरच चर्चा होईल’, हेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण