
रावळपिंडी (पाकिस्तान) – भारताकडे कितीही शस्त्रे असली किंवा कितीही मोठे सैन्य असल्याचा त्याने दावा केला, तरी तो आपल्याला घाबरवू शकत नाही. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. आपले सैन्य आणि पाकिस्तानचे लोक कोणत्याही आक्रमणाविरुद्ध पोलादी भिंतीसारखे एकत्र उभे आहेत. पाकिस्तान स्वतःच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कुराणात म्हटले आहे की, लहान सैन्य अनेकदा मोठ्या सैन्यावर मात करते, अशी हास्यास्पद विधाने पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी येथे केले. त्यांनी ही वक्तव्ये भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आक्रमणात घायाळ झालेल्या पाकिस्तानी सैनिकांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर केली.
संपादकीय भूमिकाभारत पाकला घाबरवू शकत नाही, तर नष्टच करू शकतो, इतकी त्याच्यात क्षमता आहे. आता या क्षमतेचा वापर भारताने करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! |
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण