US And Israel Thanked India : आतंकवादी अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याने अमेरिका आणि इस्रायल यांना आनंद !

अमेरिका आणि इस्रायल यांचा होता कट्टर शत्रू !

आतंकवादी अब्दुल रौफ अझहर

वॉशिंग्टन – भारताने पाकमधील आतंकवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या आक्रमणामध्ये जैश-ए-महंमदचा कुख्यात आतंकवादी अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याची माहिती समोर येताच अमेरिका आणि इस्रायल यांनी आनंद व्यक्त केला आहे. रौफच्या मृत्यूची बातमी मिळताच भारताच्या यशाचे त्यांनी कौतुक केले. जैश-ए-महंमदचा कमांडर अब्दुल रौफ अझहर हा अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांचा कट्टर शत्रू होता. रौफ याने वर्ष २००२ मध्ये अमेरिकेतील ज्यू पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तानात अपहरण करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे वर्ष २०१० मध्ये अमेरिकेने रौफवर निर्बंध लादले होते.

१. रौफ अझहरचा ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये खात्मा झाल्यानंतर अमेरिकी पत्रकार असरा नोमानी यांनी ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करून आनंद व्यक्त केला.

२. अमेरिकी कार्यकर्ता एमी मेक यांनीही अझहरच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला. पाश्चिमात्य देशांनी ‘इस्लामी आतंकवादाशी कसे लढले पाहिजे ?, हे भारताकडून शिकायला हवे’, असे म्हटले आहे.