भारतीय इतिहासाचे विकृतीकरण करणारे राणी दुर्गावती विद्यापीठ प्रशासन !
(मकबरा म्हणजे मुसलमान व्यक्तीला पुरल्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आलेले बांधकाम (कबर))
जबलपूर (मध्यप्रदेश) – जबलपूर येथील राणी दुर्गावती विद्यापिठात पदवीच्या दुसर्या वर्षाच्या ‘फाऊंडेशन कोर्स’च्या परीक्षेत राणी दुर्गावतीच्या इतिहासाचे चुकीचे वर्णन करणार्या प्रश्नामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ३ मे २०२५ या दिवशी झालेल्या ‘बीएस्सी’च्या दुसर्या वर्षाच्या ‘फाऊंडेशन कोर्स’च्या प्रश्नपत्रिकेत राणी दुर्गावती यांच्या समाधीस्थळाविषयी ‘राणी दुर्गावतीचा ‘मकबरा’ कुठे बांधला आहे ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
🔥 Outrage! Rani Durgavati’s Samadhi called a ‘Maqbara’ in a university exam! 🏛️⚠️
📚 Rani Durgavati University accused of distorting Indian history!
Shouldn’t they at least know the legacy of the queen it’s named after? 🇮🇳
🚫 Time for strict action against such anti-history… pic.twitter.com/K1rFuE2ST7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2025
१. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला; कारण राणी दुर्गावतीचे समाधीस्थळ आहे, कबर नाही. हा राणी दुर्गावतीचे शौर्य, पराक्रम आणि बलीदान यांचा अवमान असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
२. या घटनेचा विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी यांनी निषेध केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याला ’अज्ञानाचा परिणाम’ असे म्हटले आहे. इतिहासाच्या या विद्रुपीकरणाला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही परिषदेने केली आहे.
-: प्रेस विज्ञप्ति :-
प्रश्नपत्र में महान वीरांगना रानी दुर्गावती के लिए ग़लत शब्दावली का प्रयोग करना अत्यंत निंदनीय- अभाविप वीरांगना रानी दुर्गावती का अपमान विद्यार्थी बर्दाश्त नहीं करेंगे – माखन शर्मा pic.twitter.com/YQOTffdu5e
— ABVP Mahakoshal M.P. (@ABVPMK) May 5, 2025
संपादकीय भूमिका
|

संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !